IND vs SA: भारतीय टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी घटना; कर्णधार शुभमनच्या निर्णयाने सर्वच आश्चर्यचकित

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टेस्ट सिरीजचा पहिला सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर सुरू झाला आहे. या सामन्यात भारतीय टीमचा युवा कर्णधार शुभमन गिल एक खास निर्णय घेतला. ज्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झालेत.
IND vs SA
IND vs SAsaam tv
Published On

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये २ सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जातेय. हा सामना ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जातोय. आफ्रिकन टीमचा कर्णधार टेम्बा बावुमाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

या सामन्यासाठी भारतीय टीमने आपल्या प्लेइंग ११ मध्ये मोठे बदल केले असून, टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात टीम पहिल्यांदाच ६ डावखुऱ्या खेळाडूंसह मैदानात उतरला आहे. याशिवाय गोलंदाजीमघ्ये तब्बल ४ फिरकीपटूंना संधी देण्यात आली आहे. कर्णधार शुभमन गिल यांच्या या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

IND vs SA
IND vs SA VIDEO: लेगमध्ये त्याचा कॅच मिळतो...! टेम्बा बवुमासाठी पंतने आपल्या स्टाईलने लावली फिल्डींग; पुढच्याच बॉलला गेली विकेट

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाता टेस्टमध्ये टीम इंडिया प्लेइंग ११ मध्ये ६ डावखुऱ्या खेळाडूंचा समावेश केला आहे. यामध्ये यशस्वी जायस्वाल, वॉशिंग्टन सुंदर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे. यापूर्वी टीम इंडिया कधीही ६ डावखुऱ्या खेळाडूंसह टेस्ट सामन्यात उतरली नव्हती. शुभमन गिलचा हा निर्णय योग्य ठरेल की नाही, याचा निकाल कोलकाता टेस्टच्या रिझल्टवर ठरणार आहे.

IND vs SA
India vs South africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी

चौथ्यांदा तीन डावखुऱ्या स्पिनर्ससह मैदानात

टीम इंडियाने या सामन्यात एकूण ४ स्पिनर्सना संधी दिली असून त्यापैकी ३ डावखुरे आहेत. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात भारतीय टीम फक्त चौथ्यांदा तीन डावखुरे फिरकीपटूंना एकाच वेळी खेळवतेय. या सामन्यात अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे तीन डावखुरे फिरकीपटू खेळत आहेत.

IND vs SA
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेला फिरकीच्या जाळ्यात गुंडाळणार; टीम इंडिया मैदानावर उतरवणार ४ हुकुमी एक्के

टीम मॅनेजमेंटने साई सुदर्शनला बाहेर ठेवत त्याच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली आहे. मधल्या फळीत ऋषभ पंतसोबत ध्रुव जुरेललाही स्थान मिळालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com