Team India: गंभीर-गिलमध्ये वादाची ठिणगी? टीम इंडियातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; मतभेदांचं कारण चर्चेत

Gautam Gambhir Shubman Gill controversy reason: भारतीय क्रिकेट संघ सध्या एका मोठ्या अंतर्गत वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टेस्टनंतर गौतम गंभीर आणि युवा कर्णधार शुभमन गिल यांच्यातील मतभेद आता उघडपणे समोर येतोय.
Gautam Gambhir Shubman Gill controversy reason
Gautam Gambhir Shubman Gill controversy reasonsaam tv
Published On

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी दक्षिण आफ्रिकेने ३० रन्सने टीम इंडियाला पराभूत केलं. दरम्यान या लाजिरवाण्या पराभवानंतर पिचविषयीचा वाद आता समोर आाल आहे. मोठा प्रश्न असा आहे की, नवा कर्णधार शुभमन गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर हे या पीचबाबत एकमत आहेत का?

एक महिन्यापूर्वी अहमदाबादमध्ये झालेल्या वेस्ट इंडिजविरूद्धच्या सिरीजपूर्वी शुभमन गिलने म्हटलं होतं की, टीमला आता ‘टर्निंग’ पिचवर नाही तर चांगल्या पिचवर खेळण्याची इच्छा आहे. आम्हाला अशा पिचवर खेळायचंय आहे ज्या ठिकाणी गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही मदत मिळणार आहे.

ईडन गार्डन्सचं पिच कसं आहे?

टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली टेस्ट अशा पिचवर खेळली जी गिलच्या म्हणण्याप्रमाणे अगदी विरूद्ध होती. ईडन गार्डन्सचं पिच आठवडाभर पाणी न दिल्याने आणि कव्हरखाली ठेवल्याने पूर्णपणे कोरडं झालं होतं. पहिल्याच डावातच पीचला भेगा पडू लागल्या होत्या. या पिचवर एकूण 38 विकेट पडले ज्यामध्ये स्पिनर्सने 22 तर वेगवान गोलंदाजांनी 16 विकेट्स घेतले.

Gautam Gambhir Shubman Gill controversy reason
IPL 2026 चा लिलाव कधी होणार? 77 खेळाडूंवर बरसणार 237 कोटींचा पाऊस; जाणून घ्या लिलावाचे डिटेल्स

पराभवानंतर काय म्हणाला गौतम गंभीर?

कोलकात्यातील पराभवानंतर गंभीरने सांगितलं की, पिच तसंच होतं जसं टीम मॅनेजमेंटने मागितलं होतं. त्यांनी म्हटलं, “जर तुम्ही चांगले खेळत नाही तर काय होणार? विकेटमध्ये काही दोष नव्हता. आपण जिंकलो असतो तर पिचवर प्रश्नच उपस्थित झाले नसते.

कर्णधार गिल पहिल्याच दिवशी मानेच्या दुखापतीमुळे बाहेर पडला होता. त्याच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची फलंदाजी गडगडली. भारताने आपल्यात देशात गेल्या सहा टेस्ट सामन्यांपैकी चार गमावले आहेत.

Gautam Gambhir Shubman Gill controversy reason
IND vs SA : मायदेशात धूळधाण, फिरकीच्या जाळ्यात अडकली टीम इंडिया; आफ्रिकेचा 30 रन्सने विजय

गंभीरच्या आकडेवारीवर प्रश्न

गंभीर कोच असताना भारताने 18 पैकी आठ टेस्ट मॅच जिंकल्या त्यापैकी चार बांगलादेश आणि वेस्ट इंडिजसारख्या कमजोर टीमविरुद्ध होत्या. टीम इंडिया कोलकात्यात आल्यानंतर पिचवरच अनेकांचं लक्ष होतं. अशाकत क्यूरेटर सुजन मुखर्जी यांच्यासोबत सतत बैठका देखील सुरु होत्या.

Gautam Gambhir Shubman Gill controversy reason
Shubman Gill: चौकार लगावल्यानंतर शुभमन गिलच्या मानेत का झाल्या तीव्र वेदना? ही परिस्थिती किती असू शकते गंभीर?

2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात लक्ष्मण आणि द्रविड यांच्या खेळीचं साक्षीदार असलेल्या ईडनच्या पिचवर हरभजन सिंहही नाराज झाला. त्याने “कसोटी क्रिकेट संपवलं, RIP टेस्ट क्रिकेट” असं उत्तर दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com