IND vs SA : मायदेशात धूळधाण, फिरकीच्या जाळ्यात अडकली टीम इंडिया; आफ्रिकेचा 30 रन्सने विजय

IND vs SA : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागलाय.
IND vs SA
IND vs SAsaam tv
Published On

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरीज सुरु आहे. या सिरीजमधील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेच्या गोलदांजांनी १०० रन्सच्या आत टीम इंडियाचा गाशा गुंडळला.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 30 धावांनी विजय मिळवला. भारत दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना केवळ 93 रन्सवर ९ विकेट्स गेले. आफ्रिकेसाठी फिरकीपटू हार्मरने या सामन्यात एकूण 8 बळी घेतले. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने १-० अशी सिरीजमध्ये आघाडी घेतलीये. टेस्ट सिरीजमधील दुसरा सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीमध्ये खेळला जाणार आहे.

IND vs SA
IPL 2026 चा लिलाव कधी होणार? 77 खेळाडूंवर बरसणार 237 कोटींचा पाऊस; जाणून घ्या लिलावाचे डिटेल्स

सामन्याची सुरुवात कशी झाली?

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांचा संघ पहिल्या डावात फक्त 159 रन्सवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने पहिल्या डावात 189 रन्स केले. त्यामुळे भारताला पहिल्या डावाच्या आधारावर 30 रन्सची आघाडी मिळाली. त्यानंतर आफ्रिकेने दुसऱ्यांदा फलंदाजी करताना भारताला 124 रन्सचं टार्गेट दिलं होतं.

रन्सचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. मार्को जान्सेनने दोन्ही ओपनर यशस्वी जायसवाल (0 धावा) आणि केएल राहुल (1 धाव) यांना स्वस्तात बाद केले. त्यानंतर तिसरी विकेट ध्रुव जुरेल (13 धावा) याची मिळाली. ज्याने टी20 शैलीतील फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि तो साइमन हार्मरच्या जाळ्यात अडकला.

IND vs SA
Shubman Gill: टीम इंडियाला मोठा धक्का! कोलकाता टेस्टमधून शुभमन गिल बाहेर; 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा

वॉशिंगटन सुंदरची झुंज अपयशी

भारतीय टीमसाठी सर्वात मोठी आशा वॉशिंग्टन सुंदर होता. मात्र, त्याला फिरकीपटू एडेन मार्करमने बाद केलं. सुंदरने 92 चेंडूत सर्वाधिक 31 रन्स केले. ज्यात दोन चौकारांचा समावेश होता. हार्मरने नंतर कुलदीप यादवला बाद करून भारताचा स्कोअर 7/77 केला.

IND vs SA
IPL Retention 2026: आयपीएलमध्ये सर्व टीम्सची रिटेंशन लिस्ट जाहीर; पाहा कोणत्या टीममधून कोणता खेळाडू रिलीज?

अक्षर पटेलने केशव महाराजाच्या षटकात दोन षटकारांसह 16 धावा केल्या, पण त्याच षटकात आणखी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. अक्षरनंतर भारताने लगेचच सिराजचेही विकेट गमावले. शुभमन गिल फलंदाजीसाठी उपस्थित नसल्याने ९ विकेट्स गेल्यावर भारताचा पराभव झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com