

नुकतंच आयपीएल २०२६ साठी सर्व टीम्सने त्यांनी रिलीज केलेल्या खेळाडूंची लिस्ट जाहीर केली. यामध्ये अनेक मोठ्या खेळाडूंच्या नावाचा समावेश आहे. यावेळी रचिन रवींद्र, आंद्रे रसल, डेव्हन कॉन्वे, डेविड मिलर, जॉश इंग्लिश, ग्लेन मॅक्सवेल, लियाम लिव्हिंगस्टोन आणि वणिंदू हसरंगा यांसारखे मोठे परदेशी खेळाडू यंदा आयपीएल लिलावात दिसणार आहेत. मात्र या वेळी ऑक्शनमध्ये परदेशी खेळाडूंसाठी फक्त 27 जागा रिक्त आहेत. तर एकूण रिकाम्या स्लॉट्सची संख्या 77 आहे.
यंदाचा आयपीएल लिलाव एकाच दिवशी होऊ शकतो. कारण हे मिनी ऑक्शन असणार आहे. आयपीएलमध्ये एकूण 10 टीम्स खेळतात आणि प्रत्येक टीम आपल्या स्क्वाडमध्ये जास्तीत जास्त 25 खेळाडू ठेवू शकतो. आता लिलाव आणि टीमशी संबंधित नियम काय आहेत ते पाहूयात.
एका संघात जास्तीत जास्त 25 खेळाडूंचा समावेश करता येतो.
एका संघात जास्तीत जास्त 8 परदेशी खेळाडू ठेवता येतात.
लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची यादी काही दिवसांत शॉर्टलिस्ट केली जाणार आहे. एकूण 77 खेळाडूंची विक्री होणार आहे. कारण सर्व 10 टीम्समध्ये मिळून इतक्या जागा रिकाम्या आहेत. सर्वाधिक रिकाम्या जागा कोलकाता नाईट रायडर्सकडे आहेत, ते 13 खेळाडू घेऊ शकतात. सर्वात कमी जागा पंजाब किंग्सकडे आहेत, ज्यांनी 21 खेळाडू रिटेन केले आहेत.
सर्व टीम्समध्ये मिळून परदेशी खेळाडूंसाठी एकूण 27 जागा रिकाम्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्स: 9 (4 परदेशी)
मुंबई इंडियन्स: 5 (1 परदेशी)
कोलकाता नाईट रायडर्स: 13 (6 परदेशी)
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू: 8 (2 परदेशी)
सनरायझर्स हैदराबाद: 10 (2 परदेशी)
गुजरात टायटन्स: 5 (परदेशी)
राजस्थान रॉयल्स: 9 (1 परदेशी)
लखनऊ सुपर जायंट्स: 6 (4 परदेशी)
दिल्ली कॅपिटल्स: 8 (5 परदेशी)
पंजाब किंग्स: 4 (2 परदेशी)
KKR – 64.3 कोटी रुपये
CSK – 43.4 कोटी रुपये
SRH – 25.5 कोटी रुपये
LSG – 22.95 कोटी रुपये
DC – 21.8 कोटी रुपये
RCB – 16.4 कोटी रुपये
RR – 16.05 कोटी रुपये
GT – 12.9 कोटी रुपये
PBKS – 11.5 कोटी रुपये
MI – 2.75 कोटी रुपये
सर्व टीम्सचा पर्स बॅलन्स मिळून 237 कोटी रुपये आहे. सर्वाधिक पर्स कोलकाता नाईट रायडर्सकडे आहे, तर सर्वात कमी मुंबई इंडियन्सकडे आहे.
आयपीएल 2026 ऑक्शनची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नाही, पण समोर आलेल्या माहितीनुसार तो 15 डिसेंबरला होऊ शकतो.
ऑक्शनचं ठिकाण भारत असण्याची प्राथमिकता आहे. मात्र, परदेशात घेण्याचाही विचार सुरू आहे. जर भारताबाहेर झाला, तर तो यूएईमध्ये होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.