IND vs SA: शुभमन गिलच्या जागी चौथ्या क्रमांकावर कोण करणार फलंदाजी? कोचने सांगितलं 'या' खेळाडूचं नाव

who will bat at number four instead of Shubman Gill: दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये शुभमन गिलच्या मानेला दुखापत झाली. यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये त्याच्या अनुपस्थितीमुळे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची जागा रिक्त झाली आहे.
who will bat at number four instead of Shubman Gill
who will bat at number four instead of Shubman Gillsaam tv
Published On

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जात असून दुसरा सामना उद्या म्हणजेच २२ नोव्हेंबरपासून रंगणार आहे. गुवाहाटीमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यातून टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल बाहेर गेलाय. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली आहेत.

भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी गुवाहाटीमध्ये शनिवारी सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टेस्टपूर्वी कर्णधार शुभमन गिलच्या प्रकृतीबाबत माहिती दिलीये. कोटक यांनी सांगितलं की, गिलच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होतेय. अशा परिस्थितीत प्रश्न हा उपस्थित होतोय की, गिलच्या जागी फलंदाजीसाठी कोणता खेळाडू उतरणार?

who will bat at number four instead of Shubman Gill
Team India: गंभीर-गिलमध्ये वादाची ठिणगी? टीम इंडियातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; मतभेदांचं कारण चर्चेत

गिलच्या प्रकृतीबाबत काय म्हणाले कोटक?

कोटक म्हणाले, “त्याची परिस्थिती नक्कीच सुधारतेय. मी काल त्याला भेटलो होतो. फिजिओ आणि डॉक्टरांना हे ठरवायचे आहे की, तो पूर्णपणे बरा झाला तरी सामन्यादरम्यान त्याला वेदना पुन्हा होऊ नये. हे खूप महत्त्वाचं आहे. जर किंचितही शंका असेल तर तो आणखी एका सामन्यासाठी विश्रांती घेईल. खेळाडू आणि कर्णधार म्हणून शुभमनची अनुपस्थिती टीमला जाणवेल.”

ते पुढे म्हणाले, “जर गिल दुसऱ्या टेस्टमध्ये खेळला नाही, तर त्याची जागा घेण्यासाठी आमच्याकडे चांगले खेळाडू आहेत. कदाचित गुवाहाटीत गिलच्या जागी खेळणारा शतकही करू शकेल.”

फलंदाजी प्रशिक्षकांनी संकेत दिला की जर गिल दुसऱ्या टेस्टमध्ये खेळला नाही, तर त्याच्या जागी ध्रुव जुरेल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.

कोलकाता टेस्टमध्ये गिलच्या मानेला दुखापत

कोलकाता टेस्टच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना शुभमन गिलच्या मानेला ताण आल्याने दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं होतं. यावेळी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

who will bat at number four instead of Shubman Gill
Rohit Sharma : मोठी बातमी ! रोहित शर्मा कर्णधार होणार; 'दुर्लक्षित' फलंदाजाला मिळू शकते टीम इंडियात संधी

टीम इंडियासाठी गुवाहाटीत खेळली जाणारी अत्यंत महत्त्वाची आहे. कोलकात्यातील टेस्ट लो-स्कोरिंग ठरली होती. भारत 124 रन्सचं लक्ष्य गाठू शकला नाही आणि दुसऱ्या डावात 93 रन्सवर गडी बाद झाला. दक्षिण आफ्रिकेने 15 वर्षांनंतर भारतात टेस्ट जिंकली. जर टीम इंडिया पुढील टेस्ट जिंकण्यात अपयशी ठरली तर 25 वर्षांनंतर भारताला आपल्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सिरीज मालिका गमवावी लागणार आहे.

who will bat at number four instead of Shubman Gill
Rohit Sharma : पुन्हा कर्णधारपदाची चर्चा सुरू असतानाच रोहित शर्माला आणखी एक धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com