

टीम इंडियाला मोठा धक्का बसणार
शुभमन गिल दुसऱ्या टेस्टमधूनही संघाबाहेर जाणार
कर्णधारपद पंतकडे सोपवण्याची शक्यता
टीम इंडियामध्ये ऋषभ पंतची जबाबदारी वाढणार आहे. विकेट किपर असलेल्या ऋषभ पंतला आता कर्णधारपदाची भूमिका सांभाळावी लागणार आहे. टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने बुधवारी ऋषभ पंतला तयार राहण्यास सांगितलं. शुभमन गिल दुखापतग्रस्त झाल्याने ऋषभ पंतकडे दुसऱ्या कसोटी सामन्याचं कर्णधारपद सोपवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, शुभमन गिलच्या तब्येतीत सुधारणा झालेल्या नाहीत. शुभमन गिलला गुवाहाटीमध्ये कसोटी सामना खेळवण्यात आलं होतं. मात्र, कोलकाता टेस्टमध्ये खेळवल्यास त्याची तब्येत आणखी बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शुभमनच्या मानेत तीव्र वेदना होत आहेत. शुभमनला बरं होण्यासाठी ५ ते ७ दिवसांचा अवधी लागू शकतो. त्यामुळे गिल दुसरा कसोटी सामना खेळण्याची शक्यता कमी आहे.
शुभमन गिल हे दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर मालिकेतूनही बाहेर पडण्याची शक्यता आहे. सलग सामने खेळल्याने गिल दुखापत ग्रस्त झाल्याचे बोलले जात आहे. शुभमन गिल संघाच्या बाहेर गेला, तर ऋषभ पंत वनडे सीरीजमध्येही कर्णधारपद सांभाळताना दिसण्याची शक्यता आहे. वनडे टीममधून श्रेयस अय्यर देखील संघाच्या बाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तत्पूर्वी, वनडे सीरीजमध्ये कर्णधारपदासाठी केएल राहुल देखील दावेदार आहेत. मात्र, कर्णधारपदाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येत नाही, तोपर्यंत कर्णधारपद कोणाकडे सोपवण्यात येणार, याचं चित्र स्पष्ट होणार नाही. शुभमन दुखापतीतून बरा झाल्यास त्यानंतर चित्र बदलू शकते. त्यामुळे वनडे मालिकेचं कर्णधारपद कोणाकडे असणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.