

वनडे रँकिंगमध्ये रोहित शर्माची मोठी झेप
वनडे कर्णधार शुभमन गिलला मागे टाकलं
रँकिंगमध्ये रोहित शर्मा अव्वल
शुभमन गिलची तिसऱ्या स्थानी घसरण
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका झाल्यानंतर आता आयसीसीनं रँकिंग प्रसिद्ध केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या वनडे सामन्यात शतक ठोकणारा रोहित शर्मा यानं यावेळी रँकिंगमध्ये जबरदस्त वापसी केली आहे. त्यानं अव्वल स्थान पटकावलं आहे. भारतीय संघाचा युवा कर्णधार शुभमन गिललाच त्यानं मागे टाकलं आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी शुभमन गिलला कर्णधारपद देत रोहित शर्माला हटवलं होतं. रोहित शर्मा शुभमन गिलच्या नेतृत्वात पहिल्यांदाच वनडे मालिका खेळला. या मालिकेत ऑस्ट्रेलियानं २-१ ने भारताला पराभूत केलं. तिसऱ्या वनडे सामन्यात भारतानं विजय मिळवला. रोहित शर्मा यानं या सामन्यात धमाकेदार शतक झळकावून आपणच किंग असल्याचं दाखवून दिलं. या खेळीसह त्याने वनडे रँकिंगमध्ये जबरदस्त झेप घेतली आहे. वनडेमधील शुभमन गिलची बादशाहत देखील त्यानं संपुष्टात आणली. शुभमन गिलच्या रँकिंगमध्ये दोन स्थानांची घसरण झाली आहे.
रोहित शर्मा अव्वल
आयसीसीनं प्रसिद्ध केलेल्या वनडे रँकिंगमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. रोहित शर्मानं अव्वल स्थानी झेप घेतली आहे. त्यानं दोन स्थानांची झेप घेत पहिला क्रमांक पटकावला असून, ७८१ गुण आहेत. रोहित शर्मा यानं पहिल्यांदाच वनडे रँकिंगमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कर्णधारपदावरून हटवल्यानंतर तो फलंदाज म्हणून मैदानात उतरला आणि त्यानं फलंदाजीत कमाल दाखवून दिली. दुसऱ्या सामन्यात अर्धशतक आणि तिसऱ्या सामन्यात शतकी खेळी केली.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध विस्फोटक खेळी
ऑस्ट्रेलियाच्या विरोधात वनडे मालिकेत रोहित शर्मानं मोठं योगदान दिलं. पहिल्या सामन्यात तो अवघ्या ८ धावांवर बाद झाला. पण दुसऱ्या सामन्यात कमबॅक करत ७३ धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात रोहितने १२१ धावांची नाबाद खेळी केली. रोहितसह विराट कोहलीसाठीही ही मालिका अत्यंत महत्वाची होती. कोहलीने अखेरच्या सामन्यात अर्धशतक ठोकलं. पण रँकिंगमध्ये फारसा फरक पडला नाही.
शुभमन गिल आणि कोहलीची घसरण
रोहित शर्मानंतर आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अफगाणिस्तानचा इब्राहिम जादरान दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. शुभमन गिल हा पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. गिलचे ७४५ पॉइंट आहेत. पाकिस्तानचा बाबर आझम ७३९ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. न्यूझीलंडचा डेरिल मिचेल यानं एका स्थानाने झेप घेतली आहे. तो ७३४ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. विराट कोहली हा सहाव्या स्थानी आहे. त्याचे ७२५ गुण आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.