team india twitter
क्रीडा

IND vs NZ 3rd Test: विराट ते रोहित... हे 4 भारतीय खेळाडू मुंबईत शेवटचा कसोटी सामना खेळणार

India vs New Zealand 3rd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

Ankush Dhavre

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. न्यूझीलंडचा संघ या मालिकेत २-० ने आघाडीवर आहे.

त्यामुळे न्यूझीलंडचा संघ भारताला भारतात क्लिन स्विप करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर भारतीय संघ मालिकेत कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान विराट, रोहितसह आणखी काही खेळाडू आहे, जे मुंबईत आपला शेवटचा सामना खेळताना दिसून येणार आहे.

हे खेळाडू खेळणार शेवटचा सामना

रोहित शर्मा, विराट कोहली, रविंद्र जडेजा आणि आर अश्विन हे भारतीय कसोटी संघातील प्रमुख खेळाडू आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे खेळाडू भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेट खेळत आहेत. दरम्यान हे चारही खेळाडू भारतात आपला शेवटचा कसोटी सामन खेळणार, अशी पोस्ट भारताचे माजी प्रशिक्षक जॉन राईट यांनी शेअर केली आहे.

काय म्हणाले जॉन राईट

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामना मुंबईत रंगणार आहे. दरम्यान या सामन्याआधी बोलताना , जॉन राईट म्हणाले, ' शुक्रवारपासून मुंबईत सुरु होणारा सामना हा रोहित, विराट, जडेजा आणि अश्विनसारख्या दिग्गज खेळाडूंसाठी मायदेशातील शेवटचा सामना असू शकतो.'

भारतीय संघ २-० ने पिछाडीवर

ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची होती. मात्र मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. मालिकेतील पहिला सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडला होता.

या सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर पार पडला. या सामन्यातही भारतीय संघाचा एकतर्फी पराभव झाला.

या विजयासह न्यूझीलंडने पहिल्यांदाच भारताय येऊन कसोटी मालिका जिंकली आहे. दरम्यान मालिकेतील तिसरा सामना जिंकून भारतीय संघ कसोटी मालिकेत कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shatapavali Benefits: जेवणानंतर २ मिनिटं शतपावली करण्याचे फायदे!

Maharashtra Politics: कोणाला पडायचं, कुठे लढायचं, या दिवशी घेणार निर्णय; मनोज जरांगेंनी आपली रोखठोक भूमिका केली जाहीर; VIDEO

Pune Travel : बॅग भरो निकल पडो! दिवाळीच्या लाँग वीकेंडला करा पुण्याची सफर; 'या' ५ अफलातून ठिकाणांचे सौंदर्य पाहून हरखून जाल!

Nora Fatehi: नोरा फतेहीचा कातिल अंदाज; सौंदर्य पाहून घाम फुटेल

Satara Crime : धक्कादायक.. कर्ज देत नसल्याचा राग; बँकेत जात मॅनेजरवर कोयत्याने वार

SCROLL FOR NEXT