IND W vs NZ W: न्यूझीलंडला टीम इंडियाचा दणका! शानदार विजयासह मालिकेवर केला कब्जा

India Womens vs New Zealand Womens: भारतीय महिला संघ आणि न्यूझीलंड महिला संघ यांच्यात पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला आहे.
IND W vs NZ W: न्यूझीलंडला टीम इंडियाचा दणका! शानदार विजयासह मालिकेवर केला कब्जा
team indiatwitter
Published On

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार सुरू आहे. हो मालिका भारतीय संघाने २-० ने गमावली आहे. तर दुसरीकडे भारतीय महिला संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत शानदार खेळ करून दाखवला आहे. मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय महिला संघाने ६ गडी राखून विजय मिळवला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात भारतीय महिला खेळाडूंनी दमदार कामगिरी केली.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. न्यूझीलंडला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले.

मात्र त्यानंतर ब्रुक हॉलिडेने ८६ धावांची शानदार खेळी करत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं. न्यूझीलंडने या डावात २३२ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून गोलंदाजी करताना दिप्ती शर्माने ३ तर प्रिया शर्माने २ गडी बाद केले.

IND W vs NZ W: न्यूझीलंडला टीम इंडियाचा दणका! शानदार विजयासह मालिकेवर केला कब्जा
IND vs NZ 3rd Test: मुंबई कसोटीसाठी टीम इंडियात बदल! स्टार गोलंदाजाला मिळणार संधी

या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्म्रिती मंधानाच्या फलंदाजीची जादू पाहायला मिळाली. स्म्रिती मंधानाने १२२ चेंडूंचा सामना करत शानदार शतकी खेळी केली. तिला साथ देत हरमनप्रीत कौरने देखील शानदार अर्धशतकी खेळी केली.

तिने ५९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. हा सामना जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारी स्म्रिती मंधाना या सामन्याची हिरो ठरली. या शानदार कामगिरीच्या बळावर तिची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. यासह भारताने ही मालिका देखील जिंकली

IND W vs NZ W: न्यूझीलंडला टीम इंडियाचा दणका! शानदार विजयासह मालिकेवर केला कब्जा
IND vs PAK: दिवाळीच्या दिवशी रंगणार भारत- पाकिस्तान सामना! केव्हा, कधी अन् कुठे पाहता येणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com