IND vs PAK: दिवाळीच्या दिवशी रंगणार भारत- पाकिस्तान सामना! केव्हा, कधी अन् कुठे पाहता येणार?

India vs Pakistan Match Timings: दिवाळीच्या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्हॉल्टेज सामना रंगणार आहे. दरम्यान हा सामना केव्हा आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या.
IND vs PAK: दिवाळीच्या  दिवशी रंगणार भारत- पाकिस्तान सामना! केव्हा, कधी अन् कुठे पाहता येणार?
ind vs pak yandex
Published On

Hong-kong Sixes,India vs Pakistan: भारत - पाकिस्तान सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी मेजवानीच असते. केवळ भारत आणि पाकिस्तानातील फॅन्स नव्हे तर, संपूर्ण जगभरातील फॅन्स या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात.

काही दिवसांपूर्वीच एमर्जिंग एशिया कप स्पर्धेत भारत - पाकिस्तान यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळाला होता. या सामन्यातील राडा पाहायला मिळाला होता. शेवटी भारताने पाकिस्तानवर विजयाची नोंद केली होती. आता पुन्हा एकदा भारत - पाकिस्तान सामने एकत्र येणार आहेत.

दिवाळीच्या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशातील फॅन्स उत्सुक आहेत. हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धेत आणि एशिया कप स्पर्धेत आमनेसामने येत असतात. मग आता या दोन्ही स्पर्धा नाहीत, तर मग हे दोन्ही संघ कुठल्या स्पर्धेत भिडणार आहेत? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. केव्हा, कुठे आणि कधी रंगणार सामना? जाणून घ्या.

IND vs PAK: दिवाळीच्या  दिवशी रंगणार भारत- पाकिस्तान सामना! केव्हा, कधी अन् कुठे पाहता येणार?
IND vs NZ 3rd Test: मुंबई कसोटीसाठी टीम इंडियात बदल! स्टार गोलंदाजाला मिळणार संधी

दिवाळीच्या दिवशी भारत - पाकिस्तान सामना

भारतात दिवाळी ३१ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे. यासह काही ठिकाणी दिवाळीचा सण १ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. आता दिवाळीच्या दिवशीच भारत - पाकिस्तान सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे.

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ हाँगकाँगच्या सिक्सेस या स्पर्धेत आमनेसामने येणार आहेत. या स्पर्धेला येत्या १ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी ११:३० वाजता सुरुवात होईल.

IND vs PAK: दिवाळीच्या  दिवशी रंगणार भारत- पाकिस्तान सामना! केव्हा, कधी अन् कुठे पाहता येणार?
IND vs NZ 3rd Test: मुंबईत धावांचा पाऊस पडणार की विकेट्सची रांग लागणार? कशी असेल खेळपट्टी?

हा हाय व्होल्टेज सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता. या सामन्यात भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी भारताला टी -२० वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या रॉबिन उथप्पाच्या हातात आहे. यासह आणखी ६ खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे.

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ :

रॉबिन उथप्पा (कर्णधार), भरत चिपली, केदार जाधव,श्रीवत्स गोस्वामी, स्टुअर्ट बिन्नी, मनोज तिवारी, शाहबाज नदीम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com