Vaibhav Suryavanshi  saam tv
Sports

Vaibhav Suryavanshi : घरातील प्रत्येक जण फक्त वैभवसाठी जगतो, १४ वर्षांच्या शतकवीर सूर्यवंशीची संघर्षकहाणी!

Vaibhav Suryavanshi Struggle : १४ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने राजस्थान विरुद्ध गुजरात सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. आयपीएलपर्यंत पोहोचण्यासाठी वैभव आणि त्याच्या कुटुंबीयांनी संघर्ष केला. या संघर्षावर वैभवने भाष्य केले.

Yash Shirke

Vaibhav Suryavanshi Story: IPL मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी पदार्पण करणे, पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूत षटकार मारणे आणि ३५ चेंडूंमध्ये १०० धावा करणे अशा अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने शक्य करुन दाखवल्या आहेत. राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात वैभवने अनेक विक्रम मोडत इतिहास रचला. सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, रोहित शर्मा अशा मातब्बरांनी वैभव सूर्यवंशीचे कौतुक केले आहे.

आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी वैभवने खूप मेहनत घेतली आहे. लहान असल्यापासूनच तो क्रिकेटसाठी तयारी करत आहे. वैभवप्रमाणे त्याच्या आईवडिलांनीही या प्रवासामध्ये खस्ता खाल्या आहेत. आयपीएलपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासावर वैभव सूर्यवंशीने कालचा (२८ एप्रिल) सामना संपल्यानंतर भाष्य केले. 'मी आज जो काही आहे, तो माझ्या आईवडिलांमुळेच आहे', असे वैभव म्हणाला.

'माझ्या ट्रेनिंग सेशन्ससाठी माझी आई रात्री ११ वाजता झोपते आणि पहाटे २ वाजता उठते. ती जेमतेम ३ तास झोपते. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी त्यांची नोकरी सोडली. माझा मोठा भाऊ सर्व काम सांभाळतो. मोठ्या कष्टाने तो घर सांभाळत आहे. माझे वडील मला नेहमीच सपोर्ट करतात. जे लोक कठोर परिश्रण करतात, ते कधीही अपयशी होणार नाही याची काळजी देव सदैव घेत असतो. मी आज जे यश मिळवत आहे, ते माझ्या आईवडिलांमुळे आहे', असे वैभव म्हणाला.

'पहिल्या चेंडूवर षटकार मारणे ही माझ्यासाठी सामान्य बाब आहे. भारताकडून अंडर-१९ मध्ये खेळताना किंवा देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्येही मी पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला आहे. पहिले १० चेंडू खेळण्यासाठी माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. चेंडू जर माझ्या हद्दीत आला तर मी शॉट मारेन हे मी ठरवले होते. मला भारतासाठी खेळायचे आहे, त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. मी त्या पातळीपर्यंत पोहोचेपर्यंत मेहनत करत राहणार. देशासाठी चांगली कामगिरी करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन' असे वक्तव्य वैभव सूर्यवंशीने केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT