team india twitter
Sports

IND vs SA: पहिल्या टी-२० साठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११! हा खतरनाक ऑलराऊंडर पदार्पण करणार

India vs South Africa, Team India Playing XI Prediction: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

Ankush Dhavre

India vs South Africa Team India Playing XI Prediction: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ४ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. रोहितच्या निवृत्तीनंतर भारतीय टी-२० संघाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच सूर्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने ३-० ने शानदार विजय मिळवला होता. आता भारतीय संघासमोर बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघाचं आव्हान असणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ८ नोव्हेंबरला डरबनमध्ये रंगणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

बांगलादेशविरुद्ध झालेल्या शेवटच्या टी-२० सामन्यात संजू सॅमसनने शानदार शतकी खेळी केली होती. या विक्रमी खेळीच्या बळावर त्याने भारतीय संघात आपलं स्थान निश्चित केलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यात तो अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो. तर तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव स्वत: फलंदाजीला येऊ शकतो.

या सामन्यात मध्यक्रमात फलंदाजी करण्यासाठी रमनदीप सिंग, रिंकू सिंग आणि हार्दिक पंड्या यांना संधी दिली जाऊ शकते. बांगलादेशविरुद्ध झालेल्या मालिकेत हार्दिक पंड्याने शानदार फलंदाजी केली होती.

यासह गोलंदाजी करताना त्याने विकेट्सही काढून दिल्या होत्या. यासह रमनदीप सिंगने एमर्जिंक एशिया कप स्पर्धेत आपली छाप सोडली. आक्रमक फलंदाजीसह तो गोलंदाजीसाठीही प्रसिद्ध आहे. त्यामुळे सूर्या त्याला पदार्पण करण्याची संधी देऊ शकतो.

या गोलंदाजांना मिळणार संधी

तर गोलंदाजी आक्रमणाबद्दल बोलायचं झालं, तर वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंगला संधी दिली जाऊ शकते. त्याला साथ देण्यासाठी यश दयाल आणि आवेश खानला संधी दिली जाऊ शकते. तर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांच्याकडे सोपवली जाऊ शकते.

या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विशक, आवेश खान ,यश दयाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

SCROLL FOR NEXT