IND vs SA: 'या' आठ भारतीय खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मध्ये केल्या सर्वाधिक धावा; सध्याच्या संघात यापैकी फक्त एक खेळाडू

India vs South Africa T-20 series: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला या फॉरमॅटमध्ये विजयी मोहीम सुरू ठेवायची आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची T-20 मालिका शुक्रवारपासून सुरू होत आहे.
T-20 Series
India VS South AfricaYandex
Published On

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची T-20 मालिका शुक्रवारपासून सुरू होत आहे. या मालिकेत सर्वांच्या नजरा भारताच्या युवा संघावर आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला या फॉरमॅटमध्ये विजयी मोहीम सुरू ठेवायची आहे. या संघात अनेक तरुणांचा समावेश करण्यात आला आहे. विजयकुमार वैशाखपासून यश दयालपर्यंत भारतीय संघाला विजयापर्यंत नेण्याची जबाबदारी काही नव्या खेळाडूंवर आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप आठ भारतीय फलंदाजांपैकी फक्त एकच सध्याच्या भारतीय संघात आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 18 सामन्यांच्या 17 डावांमध्ये 130च्या स्ट्राईक रेटने 429 धावा केल्या आहेत. या काळात त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर विराट कोहली 394 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. सध्याचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सात डावात 175.63 च्या स्ट्राईक रेटने 346 धावा केल्या आहेत.

T-20 Series
IPL 2025 Auction: केएल राहुल ते रिषभ पंत.. या खेळाडूंना लय डिमांड; बेस प्राईज 2 कोटी, पाहा संपूर्ण यादी

सुरेश रैना 339 धावांसह चौथ्या क्रमांकावर, शिखर धवन 233 धावांसह पाचव्या क्रमांकावर, दिनेश कार्तिक 221 धावांसह सहाव्या क्रमांकावर, ईशान किशन 206 धावांसह सातव्या आणि एमएस धोनी 204 धावांसह आठव्या क्रमांकावर आहे. सध्याच्या आठ संघात फक्त सूर्यकुमार यादव आहे. ईशान वगळता बाकीचे सर्वजण निवृत्त झाले आहेत. हार्दिक पंड्या 172 धावांसह नवव्या तर मनीष पांडे 121 धावांसह 10 व्या क्रमांकावर आहे.

T-20 Series
IPL 2025: आयपीएल गाजवलेले हे 3 खेळाडू लिलावात अन्सोल्ड जाणार; Base Price ही मिळणं कठीण

रोहित शर्माच्या नावावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मध्ये भारतीयाने सर्वोत्तम खेळी खेळण्याचा विक्रमही केला आहे. त्याने 2015 मध्ये धर्मशाला येथे प्रोटीजविरुद्ध 106 धावा केल्या होत्या. तर सुरेश रैना 101 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 2010 मध्ये ग्रॉस आयलेट येथे झालेल्या T20 विश्वचषकादरम्यान त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 101 धावांची खेळी खेळली होती.

सूर्यकुमार यादव 100 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने गेल्या वर्षी जोहान्सबर्गमध्ये प्रोटीजविरुद्ध 100 धावा केल्या होत्या. यानंतर मनीष पांडेचे नाव येते. त्याने 2018 मध्ये सेंच्युरियनमध्ये नाबाद 79 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर पाचव्या क्रमांकावर संयुक्तपणे दोन फलंदाज आहेत. विराट कोहलीने या वर्षी (2024) T20 विश्वचषक स्पर्धेत बार्बाडोसमध्ये 76-76 धावांची खेळी खेळली होती आणि ईशान किशनने 2022 मध्ये नवी दिल्लीत 76-76 धावांची इनिंग खेळली होती.

Written By: Dhanshri Shintre.

T-20 Series
IPL 2025 Mega Auction: 'या' भारतीय खेळाडूंना लिलावात भारी डिमांड, कोट्यवधी रुपयांची आहे Base Price

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com