Arshdeep Singh Record: 'सिंग इज किंग'; आफ्रिकेत अर्शदीपने रचला इतिहास, कोणालाच नाही करता अशी कामगिरी

Arshdeep Singh : अर्शदीप सिंगने पाच बळी मिळवत दक्षिण आफ्रिकेचे कंबरडे मोडले. त्याचबरोबर अर्शदीपने क्रिकेट विश्वात इतिहास रचलाय. काय आहे हा विक्रम हे आपण जाणून घेऊ.
Arshdeep Singh
Arshdeep Singh saam Tv
Published On

Arshdeep Singh Record In Against South Africa Cricket Match:

अर्शदीप सिंगच्या भेदक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला गुडघे टेकावे लागले. पण या नेत्रदीपक कामगिरीसह आता अर्शदीपने इतिहास रचलाय. कारण अर्शदीपसारखी कामगिरी कोणालाही करता आलेली नाही. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात अर्शदीपने पाच बळी घेतल्यानं त्याने इतिहास रचलाय. (Latest News)

आतापर्यंत भारताच्या कोणत्याही गोलंदाजाला दक्षिण आफ्रिकेत वनडे क्रिकेटमध्ये पाच विकेट्स मिळवता आले नव्हते.पण अर्शदीपने ही किमया आपल्या चौथ्याच वनडे सामन्यात करून दाखवली. अर्शदीपला यावेळी आवेश खानची चांगली साथ मिळाली. आवेश खानने चार बळी घेतले. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या ९ फलंदाजांना माघारी धाडले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघ पहिल्या वनडे सामन्यात ११६ धावांवर ऑल आऊट झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सिंग इज किंग

अर्शदीप हा एकमेव असा भारतीय वेगवान गोलंदाज ठरलाय. ज्याने दक्षिण आफ्रिकेत त्या देशाच्या संघाविरुद्ध वनडे सामना खेळताना ५ बळी घेतले. याआधी दक्षिण आफ्रिकेत आफ्रिकन संघाविरुद्ध खेळताना कोणत्याही भारतीय वेगवान गोलंदाजाला हा पराक्रम करता आला नाही. दरम्यान या सामन्यात अर्शदीपने १० षटके टाकली ज्यात त्याने ३७ धाव देत ५ बळी घेतले. अर्शदीप हा तिसरा भारतीय गोलंदाज आहे ज्याने दक्षिण आफ्रिकेत ५ किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा विक्रम केला.

दरम्यान दक्षिण आफ्रिकेत ५ किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा विक्रम करणारा अर्शदीप हा तिसरा भारतीय गोलंदाज ठरलाय. अर्शदीपच्या आधी आशिष नेहराने २००३ च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध ६ विकेट्स घेतल्या होत्या. तर २०१८ मध्ये युजवेंद्र चहलने सेंच्युरियनमध्ये आफ्रिकच्या संघाविरुद्धच्या सामन्यात 5 विकेट घेतल्या होत्या. पण अर्शदीपने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय.

आज दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना झाला. नाणेफेक जिंकल्यानंतर आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय सपशेल चुकला. भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांना मोठी खेळी करू दिली नाही. एकट्या अर्शदीपने या सामन्यात पाच विकेट्स घेतल्या आणि आफ्रिकेच्या संघाला ११६ धावांवर रोखलं. यानंतर ११७ धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने ८ विकेट राखत विजय मिळवला.

Arshdeep Singh
Ind vs SA 1st ODI: टीम इंडियाने द.आफ्रिकेला दिवसा दाखवले तारे! सुदर्शन-अय्यरच्या फिफ्टीने विजयाची नौका पार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com