Ind vs SA 1st ODI: टीम इंडियाने द.आफ्रिकेला दिवसा दाखवले तारे! सुदर्शन-अय्यरच्या फिफ्टीने विजयाची नौका पार

Ind vs SA 1st ODI: तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना टीम इंडियाने जिंकला.
Ind vs SA 1st ODI
Ind vs SA 1st ODISaam tv
Published On

Ind vs SA 1st ODI Team India won :

आज दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना होत आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने आफ्रिकेचा दारूण पराभव केला. भारतीय संघाने ८ गडी राखत हा विजय मिळवला.साई सुदर्शन आणि श्रेयस अय्यरने अर्धशतक करत भारताला विजय मिळवून दिला. परंतु या विजयाचे खरे शिल्पकार ठरलेत अर्शदीप सिंग आणि आवेश खान. अर्शदीपने सिंगने ३७ धावा देत ५ विकेट घेतल्या. तर आवेश खानने ४ गडी बाद केले. (Latest News)

५० षटकाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ फक्त २७.३ षटकात ११६ धावा करू शकला. आफ्रिकेच्या संघाने दिलेल्या या माफक आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. ऋतुराज गायकवाड अवघ्या ५ धावा करून बाद झाला. पण यानंतर साई सुदर्शनने ५५ धावा केल्या. तमिळनाडूचा २२ वर्षीय साई सुदर्शन याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक केलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऋतुराज गायकवाडसोबत सलामी आलेल्या सुदर्शनने शानदार खेळाचे प्रदर्शन करत सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं. ऋतुराज बाद झाल्यानंतर मैदानात श्रेयस अय्यर आला त्याने ५२ धावा केल्या. या दोघांचे अर्धशतक आणि त्यानंतर टिळक वर्माने विजयी धावा करत भारताने आफ्रिकेवर ०-१ अशी आघाडी केलीय .

केएल राहुल टीम इंडियाच्या संघाचे नेतृत्व करत आहे. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या षटकापासून आफ्रिकेच्या संघावर दबाव ठेवला. या दडपणाखाली आफ्रिकेचा संघ २७.३ षटकात ११६ धावांमध्ये बाद झाला. भारताकडून गोलंदाजी करताना या सामन्यात अर्शदीपने १० षटके टाकली ज्यात त्याने ३७ धाव देत ५ बळी घेतले. अर्शदीप हा तिसरा भारतीय गोलंदाज आहे, ज्याने दक्षिण आफ्रिकेत ५ किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा विक्रम केला.

Ind vs SA 1st ODI
Arshdeep Singh Record: 'सिंग इज किंग'; आफ्रिकेत अर्शदीपने रचला इतिहास, कोणालाच नाही करता अशी कामगिरी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com