Ind vs SA 1st ODI:पहिल्या वनडे सामन्यात अर्शदीप सिंग, आवेश खानचा जलवा; आफ्रिकेला केलं अवघ्या ११६ धावांत ढेर!

Ind vs SA 1st ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या मालिकेचा आज पहिला सामना होत आहे. आज दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात खेळला जात आहे. भारतीय गोलंदाजी पुढे आफ्रिकेचे फलंदाज अवघ्या ११६ धावांमध्ये ढेर झालेत.
Ind vs SA  1st ODI
Ind vs SA 1st ODITwitter
Published On

India vs South Africa 1st ODI:

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना आज जोहान्सबर्गच्या न्यू वाँडरर्स स्टेडियमवर अर्शदीप सिंग आणि आवेश खानचा जलवा पाहायला मिळाला. या दोन्ही गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांना मोठी खेळी करू दिली नाही. अर्शदीपने ५ विकेट घेतल्या तर आवेश खानने ४ विकेट घेत आफ्रिकेच्या संघाला अवघ्या ११६ धावांवर बाद केलं. (Latest News)

केएल राहुल टीम इंडियाच्या संघाचे नेतृत्व करत आहे. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या षटकापासून आफ्रिकेच्या संघावर दबाव ठेवला. या दडपणाखाली आफ्रिकेचा संघ २७.३ षटकात ११६ धावांमध्ये बाद झाला. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंगने पाच विकेट्स घेतल्या. तर आवेश खानने चार विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवने नंद्रा बर्गरला क्लीन बॉलिंग देत आफ्रिकेचा डाव गुंडाळला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाणेफेक जिंकून आफ्रिकेने फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा आघाडीचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सुरुवातीला आफ्रिकन संघाच्या फलंदाजाला सळो कि पळो करून सोडलं. अर्शदीपने पहिल्याच षटकात सलग दोन विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारतीय संघाला आफ्रिकन संघावर दबाव निर्माण करण्यास मदत झाली.

आफ्रिकेच्या संघाची धावसंख्या दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्याच षटकात दोन मोठे धक्के बसले. अर्शदीपने आपल्या षटकातील चौथ्या चेंडूवर रीझा हेंड्रिक्सला त्रिफळाचीत केले. यानंतर पुढच्याच चेंडूवर रॅसी-व्हॅन-डर डुसेनला पायचीत बाद केलं. यानंतर आठव्या षटकात पुन्हा अर्शदीपने टोनी डी जॉर्जीला झेलबाद केलं. यानंतर १०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अर्शदीपने हेनरिक क्लासेनला त्रिफळाचीत केलं. अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांनी अफलातून गोलंदाजी केली.

Ind vs SA  1st ODI
Vijay Hazare Trophy: हरियाणाने पहिल्यांदा जिंकली विजय हजारे ट्रॉफी, अंतिम सामन्यात राजस्थानचा पराभव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com