येत्या ३० ऑगस्टपासून आशिया चषक २०२३ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारतीय संघाने पाकिस्ताानात जाऊन खेळण्यास नकार दिल्याने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत तर ४ सामने पाकिस्तानात खेळवले जाणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे.
दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.या संघात संजू सॅमसनची राखीव यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर संघाचे उपकर्णधारपद हार्दिक पंड्याकडे असणार आहे.
या खेळाडूंचं झालं कमबॅक..
आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ आणखी मजबूत होऊन मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत केएल राहुल आणि श्रेयस अय्यर कमबॅक करताना दिसून येणार आहे. हे दोघेही दुखापतीमूळे संघाबाहेर झाले होते. आता दोघांचं संघात कमबॅक झाल्याने भारतीय संघाचा मध्यक्रम मजबूत होणार आहे. तर तिलक वर्माला देखील या संघात स्थान दिलं गेलं आहे.
या संघात कर्णधार रोहित शर्मासह शुबमन गिल, तिलक वर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि ईशान किशनला संधी दिली गेली आहे. तर संजू सॅमसनला या संघात राखीव खेळाडू म्हणून स्थान दिलं गेलं आहे. तर फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादवला संधी दिली गेली आहे. (Latest sports updates)
असा आहे भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, हार्दिक पांड्या, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर. , सूर्यकुमार यादव , तिलक वर्मा , प्रसिद्ध कृष्णा , संजू सॅमसन (राखीव).
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.