आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी -२० सामन्यात रिंकू सिंगची बॅट चांगलीच तळपली. आपल्या दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने आयरिश गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्याची आक्रमक फलंदाजी पाहून असं वाटतच नव्हतं की तो आपल्या कारकिर्दीतील केवळ दुसराच सामना खेळतोय.
या आक्रमक खेळीच्या बळावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली होती. दरम्यान सामना झाल्यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहने मन जिंकणारे कृत्य केले आहे.
आयपीएल स्पर्धेत आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत त्याने भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. दुसऱ्याच सामन्यात त्याने १८० च्या स्ट्राइक रेटने धावा चोपल्या. त्यामुळे त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली होती. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी त्याला मॅच प्रेझेंटेशनमध्ये बोलावण्यात आलं होतं.
त्यावेळी तो होस्टसोबत इंग्रजी बोलताना घाबरत होता. हे पाहून कर्णधार जसप्रीत बुमराह तिथे आला आणि त्याने रिंकू सिंगच्या ट्रांसलेटरची भूमिका पार पाडली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे.
मॅच प्रेझेंटेशनमध्ये होस्ट इंग्रजीत प्रश्न विचारत होता. रिंकू सिंगला इंग्रजी बोलता येत नव्हतं. त्यावेळी जसप्रीत बुमराहने त्याला ईशारा करत म्हटले की, ' मी आहे ना.. ' मग काय, होस्ट रिंकूला इंग्रजीत प्रश्न विचारत होता आणि जसप्रीत बुमराह त्याला हिंदीमध्ये ट्रांसलेट करून सांगत होता. अशाप्रकारे सामनावीर बनल्यानंतर रिंकू सिंगची पाहिली मुलाखत पार पडली. (Latest sports updates)
या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. भारतीय संघाकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ५८ तर रिंकू सिंगने ३८ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाला २० षटक अखेर १८५ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना आयर्लंड संघाला केवळ १५२ धावा करता आल्या. यासह भारतीय संघाने या सामन्यात ३३ धावांनी विजय मिळवत मालिकेत २-० ची आघाडी घेतली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.