IND vs IRE 2nd T20I: सामना जिंकला, मालिकाही जिंकली; तरीही बुमराहला सतावतेय 'या' गोष्टीची चिंता! स्वत:च केला धक्कादायक खुलासा

Jasprit Bumrah Statement: सामना झाल्यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहने मोठा खुलासा केला आहे.
jasprit bumrah statement
jasprit bumrah statementsaam tv
Published On

Jasprit Bumrah Statement After IND vs IRE 2nd T20I:

भारत विरुद्ध आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा टी -२० सामना रविवारी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवत मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.

या मालिकेत भारतीय संघाची जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघ दमदार कामगिरी करत आहे. दरम्यान दुसऱ्या टी -२० सामन्यानंतर त्याने जसप्रीत बुमराहने मोठा खुलासा केला आहे.

jasprit bumrah statement
FIFA Women's World Cup Final: स्पेनने जिंकून दाखवलं; इंग्लंडला पराभूत करत कोरलं वूमेन्स फुटबॉल विश्वचषकावर नाव

भारतीय संघाने दुसरा सामना जिंकला. मात्र या सामन्यानंतर बुमराहने प्लेइंग ११ बाबत खुलासा केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्याने म्हटले की, ' मला खूप आनंद होतोय. खेळपट्टी आज थोडी कोरडी होती. आम्हाला असं वाटलं होतं की, खेळपट्टी स्लो होईल. त्यामुळे आम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्लेइंग ११ ची निवड करणं खूप कठीण आहे. संघातील प्रत्येक खेळाडू देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्सुक आहे. जेव्हा आपण अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानात उतरतो त्यावेळी दबाव असतो. मात्र अपेक्षांचं ओझं बाजूला ठेवावं लागेल. जेव्हा आपण इतक्या अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानात उतरतो त्यावेळी आपण १०० टक्के देऊ शकत नाही.' (Latest sports updates)

jasprit bumrah statement
IND vs IRE 2nd T20I: टीम इंडियाचा टी-20 मालिकेवर कब्जा; भारताने 33 धावांनी उडवला आयर्लंडचा धुव्वा

भारतीय संघाचा जोरदार विजय...

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर आयरिश कर्णधार पॉल स्टर्लिंगने भारतीय संघाला फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटक अखेर १८५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ अवघ्या १५२ धावा करू शकला. या सामन्यात आयर्लंड संघाला ३३ धावांनी गमवावा लागला.

भारतीय संघाकडून कर्णधार जसप्रीत बुमराहसह, ऋतुराज गायकवाड आणि रिंकू सिंग यांनी दमदार कामगिरी केली. या कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com