IND vs BAN: विराटचा मास्टरप्लान अन् Washington च्या 'सुंदर' बॉलवर टॉम लेथमची बत्ती गुल- VIDEO
IND vs NZ 3rd, 1st Inning: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. भारतीय संघासाठी अतिशय महत्वाच्या अशा सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सुरुवातीलाच भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला २ मोठे धक्के दिले आहेत.
वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. भारताकडून गोलंदाजी करताना आकाश दीपने चांगली सुरुवात करुन दिली. आकाशने तिसऱ्याच षटकात न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. त्याने कॉनव्हेला पायचित करत माघारी धाडलं. न्यूझीलंडला १५ धावांवर पहिला धक्का बसला.
विराटचा तो प्लान सक्सेसफुल ठरला
डेवोन कॉनव्हे बाद झाल्यानंतर टॉम लेथमने मोर्चा सांभाळला. त्याने संघाची धावसंख्या ५० पार पोहोचवली. तो अर्धशतकाच्या दिशेने जात असताना, वॉशिंग्टन सुंदरने त्याला क्लिन बोल्ड करत माघारी धाडलं.
भारताकडून १६ वे षटक टाकण्यासाठी वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजीला आला होता. हे षटक सुरु होण्यापूर्वी विराटने सुंदरला बॉल कसा टाकायचा आहे, हे सांगितलं होतं. त्यानंतर याच षटकातील शेवटच्या चेंडूवर सुंदरने लेथमची दांडी गुल केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
न्यूझीलंड - टॉम लेथम (कर्णधार), डेवोन कॉनव्हे, विल यंग, रचिन रविंद्र, डेरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, इश सोढी, मॅट हेनरी, एजाज पटेल, विल्यम ओ’रुर्क.
भारत: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.