Hardik Pandya  SaamTv
Sports

Hardik Pandya Video : हार्दिक...हार्दिक...!! ज्या वानखेडेवर खिल्ली उडवली, त्याच मैदानात जयघोष! एकदा व्हिडिओ बघाच!

Hardik Pandya: टी 20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियाचा संघ मुंबईत पोहोचलाय. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाचं स्वागत केलं जाणार असून त्यांचे अभिनंदन केलं जाणार आहे.

Bharat Jadhav

टीम इंडियाचे खेळाडू मुंबई विमानतळावर पोहचलेत. टीम इंडियाच्या खेळाडूंची बाहेर पडण्याची प्रतिक्षा केली जातेय. आपल्या खेळडूंचे स्वागत करण्यासाठी लाखो चाहते आज मुंबईत नरिमन पॉईंट परिसरात दाखल झालेत. चाहत्यांकडून टीम इंडियाचा कर्णधारासह अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या नावाच्या घोषणा देण्यात येत होत्या.

जे ज्या मैदानावर हार्दिकला ट्रोल केलं जात होतं त्याच मैदानात हार्दिक, हार्दिक नावाच्या घोषणा दिल्या जात आहेत. हा क्षण हार्दिक आणि त्यांच्या चाहत्यांसाठी अनमोल होता. यंदाच्या आयपीएल सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाला विशेष कामगिरी करता आली नव्हती. या आयपीएल सामन्यात हार्दिकला हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्यात मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधारपद हार्दिककडे होते. यामुळे त्याला ट्रोल करण्यात आलं होतं.

अहमदाबादच्या स्टेडियवरदेखील त्याला ट्रोलिगला बळी पडावं लागलं होतं. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यातही हार्दिक पंड्याला ट्रोल करण्यात आलं होतं. सतत होणाऱ्या ट्रोलिंगमुळे हार्दिक पंड्याचा खेळावर परिणाम झाला होता. इंडियन प्रीमियर लीगनंतर भारतीय संघाचे खेळाडू थेट न्यूयॉर्कला गेले, तर हार्दिक पंड्याने T20 विश्वचषकापूर्वी काही शांत दिवस घालवण्यासाठी लंडनला गेला होता. दोन महिन्यांच्या आयपीएलनंतर तो शारीरिकदृष्ट्या सुस्थितीत होता पण मानसिकदृष्ट्या तो खचला होता. पंड्याला आयपीएल सामन्यादरम्यान अपमानास्पद अनुभव आला होता.

त्याचा त्याच्या मानसीकस्थितीवर परिणाम झाला होता. या जखमा भरून काढण्याची गरज होती. विश्वचषकासाठी त्याच्या दृष्टिकोन आणि नियोजनासाठी उत्साही मनाची गरज होती. तेथून आल्यानंतर हार्दिकने वर्ल्डकपमध्ये साजेशी खेळी केली. हार्दिकने या टी 20 वर्ल्ड कपमध्ये साखळी ते अंतिम असे एकूण 8 सामने खेळले. या 8 सामन्यात त्याने 48 च्या सरासरीने 144 धावा केल्या. तर 7.64 च्या इकॉनॉमीने 11 विकेट्सही घेतल्या. पण अंतिम सामन्यातील त्याची कामगिरी कौतकास्पद होती. त्याचे फलित आज त्याच्या नावाचा झालेला जयघोष.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Luckiest zodiac signs: आज कोणाच्या जीवनात येणार शुभवार्ता? पंचांग आणि ग्रहयोग देतायत मोठं संकेत!

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Sleep Health: अचानक चिडचिड वाढतेय आणि स्क्रिन टाईमपण वाढलाय? ८ वर्षांच्या संशोधनात समोर आलं धक्कादायक कारण

Mumbai Crime: मुंबई हादरली! बर्थडे सेलिब्रेशनवेळी ५ मित्रांनी तरुणाला पेट्रोल टाकून पेटवलं, थरकाप उडवणारा VIDEO

Education Department Scam : शिक्षण विभागात खळबळ! तब्बल १ लाखांची लाच घेताना बड्या अधिकार्‍याला रंगहाथ पकडले

SCROLL FOR NEXT