IND vs IRE: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा विजयाने 'श्रीगणेशा', आयर्लंडचा पराभव

India vs Ireland T20 World Cup 2024: न्यू यॉर्कमध्ये अ गटातील पहिल्या सामन्यात टी इंडियाने आयर्लंडचा ८ गडी राखून पराभव केला.
IND vs IRE: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा विजयाने 'श्रीगणेशा', आयर्लंडचा पराभव
India vs Ireland T20 World Cup 2024

टीम इंडियाने २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचा प्रवास विजयाने सुरू केलाय. आयर्लंड संघाने दिलेल्या माफक धावांचे आव्हान टीम इंडियाने ८ विकेट राखत पार केले. भारतीय संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर आयर्लंडचा संघ ९६ धावांवर बाद झाला होता.

न्यू यॉर्कमध्ये अ गटातील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने वेगवान गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर आयर्लंडचा ८ गडी राखून पराभव केला. टी२० विश्वचषकात भारत आणि आयर्लंड यांच्यातील हा पहिलाच सामना होता. न्यूयॉर्क स्टेडियमवर झालेल्या दक्षिण आफ्रिका-श्रीलंका सामन्याप्रमाणे त्यातही वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व दिसले. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी आयर्लंडच्या संघाची दाणादाण उडवली.

हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी आयर्लंडला अवघ्या ९६धावांत गुंडाळून टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने दमदार अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. या विजयाने टीम इंडियाने आपले खाते उघडले. मात्र कर्णधार रोहित शर्मा रिटायर्ड हर्ट झाल्याने क्रिकेट प्रेमी नाराज झाले होते.

नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील खेळपट्टी कठीण होती. ड्रॉप-इन खेळपट्टी आणि संथ आउटफिल्डमुळे धावा काढणे कठीण होते. खेळपट्टीच्या असमान उसळी व्यतिरिक्त नासाऊ काउंटीमध्ये उपलब्ध असलेल्या स्विंगमुळे वेगवान गोलंदाजांना प्रचंड मदत मिळाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com