Manasvi Choudhary
लग्नात तसेच पूजेच्या कार्यात महिला खास मराठमोळा लूक करतात. यामध्ये आता तुम्ही लेटेस्ट ट्रेडिंगच्या कलमकारी साड्या नेसू शकतात.
कलमकारी साड्या या हातकाम केलेल्या असतात. साड्यांमधील नक्षीकाम, नैसर्गिक रंग फार आकर्षक असतात यामुळे या साड्या नेसल्यावर रॉयल लूक दिसतो.
हँडपेंटेड कलमकारी साडी ही पूर्णत: हाताने नक्षीकाम केलेली असते. यामध्ये रामायण, महाभारत किंवा कृष्णाच्या लीलांची चित्रे रेखाटलेली असतात.
ऑफिस वेअर किंवा फॉर्मल मीटिंगसाठी तुम्ही प्लेन आणि काठावर कलमकारीचे काम केलेली साडी नेसू शकता.
सिल्क किंवा कॉटन साडीवर कलमकारी कापडाचे पॅच जोडलेले असतात आजकाल या साड्या खूप ट्रेडिंगमध्ये आहेत.
जर साडीवर खूप नक्षी असेल, तर प्लेन ब्लाऊज घाला आणि जर साडी साधी असेल, तर कलमकारी प्रिंटचे 'हाय-नेक' किंवा 'एल्बो स्लीव्हज' ब्लाऊज शिवा.
कलमकारी साडीवर ऑक्सिडाइज्ड दागिने किंवा लाकडी मण्यांच्या माळा सर्वात जास्त शोभून दिसतात.