Team India Victory Parade: टीम इंडियाच्या वर्ल्डकप वियजी रॅलीसाठी ओपन बस सज्ज! पाहा पहिली झलक -VIDEO
team india victory celebration bustwitter

Team India Victory Parade: टीम इंडियाच्या वर्ल्डकप वियजी रॅलीसाठी ओपन बस सज्ज! पाहा पहिली झलक -VIDEO

Team India Victory Celebration bus In Mumbai: भारतीय संघाच्या वर्ल्डकप विजयाचा जल्लोष मुंबईत होणार आहे. या विजयी रॅलीसाठी जी बस वापरली जाणार आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Published on

भारतीय संघाच्या वर्ल्डकप विजयाच्या जल्लोषाची तयारी सुरु झाली आहे. गुरुवारी सकाळी ६ वाजता बारबाडोसहून येणारं विमान दिल्लीत लँड झालं आणि चाहत्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. भारताचा संघ दिल्लीत दाखल होणार म्हणून क्रिकेट फॅन्सने मध्यरात्रीपासून दिल्ली विमानतळावर तुफान गर्दी केली. दरम्यान मुंबईत आल्यानंतर भारतीय संघाची विजयी रॅली काढली जाणार आहे. मुंबईत ज्या बसमधून ही रॅली काढली जाणार आहे, त्या बसची पहिली झलक समोर आली आहे.

भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत दमदार कामगिरी केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीयस संघाने स्पर्धेतील सर्व सामने जिंकले आणि फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. यासह दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. भारतीय संघाने ११ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयसीसीची ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे जल्लोषही तितकाच जोरदार केला जाणार आहे. दरम्यान

Team India Victory Parade: टीम इंडियाच्या वर्ल्डकप वियजी रॅलीसाठी ओपन बस सज्ज! पाहा पहिली झलक -VIDEO
IND vs SA, Final: हार्दिकला विसरून कसं चालेल? आयपीएलचा व्हिलन ते वर्ल्डकपचा हिरो

बसची पहिली झलक आली समोर

ठरलेल्या वेळापत्रकानुसार, भारतीय संघ सकाळी ६ वाजता दिल्लीत दाखल जाणार आहे. भारतीय खेळाडू ITC Maurya हॉटेलमध्ये थांबणार आहेत. त्यानंतर ११ वाजता भारतीय खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. इथे भारतीय खेळाडू नरेंद्र मोदींसोबत नाश्ता करणार आहेत. यासह खेळाडूंचा सत्कारही केला जाणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता मुंबईतील नरीमन पॉईंट येथून विजयी रॅली काढली जाणार आहे.

ही विजयी रॅली ओपन बसमधून काढली जाणार आहे. या बसची पहिली झलक समोर आली आहे. तुम्ही पाहू शकता की, या ओपन बसवर भारतीय संघाचा वर्ल्डकप ट्रॉफीसोबतचा मोठा फोटो आहे. या बसवर चॅम्पियन्स असं लिहण्यात आलं आहे. याच बसमधून भारतीय संघाची विजयी रॅली काढली जाणार आहे. ही रॅली संध्याकाळी ५ वाजता काढली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com