Team India News: वर्ल्डकप विजेत्यांचा होणार गौरव! रोहितसह महाराष्ट्रातील या 3 खेळाडूंना CM शिंदेंकडून भेटीचं आमंत्रण

Eknath Shinde Invites World Cup Winners: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघातील खेळाडूंना आमंत्रण दिलं आहे.
team india
team indiatwitter

अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये झालेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने घवघवीत यश मिळवलं आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना गमावलेला नाही. स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी विजय मिळवला. दरम्यान या विजयानंतर भारतीय खेळाडूंचं मायदेशात जोरदार स्वागत करण्यात आलं आहे.

वर्ल्डकपविजेत्या भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. भारतात येताच भारतीय संघाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. मोदींची भेट घेतल्यानंतर भारतीय खेळाडू मुंबईला येण्यासाठी रवाना झाले आहेत. मुंबईत नरिमन पॉईंट ते मरिन ड्राईव्हपर्यंत भारतीय संघाची ओपन बस रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

team india
IND vs SA, Final: हार्दिकला विसरून कसं चालेल? आयपीएलचा व्हिलन ते वर्ल्डकपचा हिरो

नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताचा कर्णधार रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांना विधानसभेत बोलावलं आहे. हे चारही खेळाडू महाराष्ट्राचे आहेत. हे चारही खेळाडू ५ जुलै रोजी विधानसभेत येणार आहेत.

team india
Team India Celebration: वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियाचं मायदेशी स्वागत, जल्लोषाचे Photo पाहा

नरेंद्र मोदींची घेतली भेट

भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकताच नरेंद्र मोदींनी भारतीय संघातील खेळाडूंचं कॉल करुन अभिनंदन केलं होतं. त्यानंतर त्यांना भेटण्यासाठी बोलावलं होतं. भारतीय खेळाडू बुधवारी दिल्लीत दाखल होताच. ICT Maurya हॉटेलमध्ये गेले. त्यानंतर ११ वाजता नरेंद्र मोदींच्या निवास स्थानी गेले. मोदींनी भारतीय खेळाडूंना वर्ल्डकप विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com