बार्बाडोसच्या केंसिग्टन ओवल मैदानात दक्षिण आफ्रिकेला धुळ चारत भारतीय क्रिकेट संघाने इतिहास घडवला. टीम इंडियाने टी ट्वेंटी विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर देशभरात जणू दिवाळी साजरी होत आहे. विश्वविजेत्या टीम इंडियाचे स्वागत करण्यासाठी अवघा देश सज्ज झाला आहे. मात्र विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया मोठ्या संकटात सापडली असून मायदेशी परतण्याचे दोर बंद झालेत. नेमकं काय घडतय उत्तर अमेरिकेत? जाणून घ्या सविस्तर.
विश्वचषक विजेत्या टीम इंडियाची मायदेशी परतण्याची प्रत्येक भारतीय वाट पाहत आहेत. मात्र बार्बाडोसमध्ये टीम इंडियावर नवं संकट कोसळले आहे. उत्तर अमेरिकेतल्या बार्बाडोसमध्ये चक्रीवादळाने थैमान घातले आहे. या वादळामुळे वीज आणि पाण्याची मोठी समस्या उद्भवली असून सर्व विमान उड्डाणेही रद्द करण्यात आली आहे..
फक्त टीम इंडियाचे खेळाडूचं नव्हेतर भारतीय संघांसोबत गेलेले अनेक माध्यमांचे प्रतिनिधी तसेच बीसीसीआयचे सचिव जय शहासुद्धा अडकून पडलेत. चक्रिवादळाच्या धोक्याने कर्फ्यू लावल्याने सगळ्या विमानांची उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे सर्व भारतीय खेळाडूंना हॉटेल सोडून बाहेर पडता येणार नाही.
कधी परत येणार?
दरम्यान, वादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाला बार्बाडोसला जाण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. वादळाचा प्रभाव काही तासात पूर्णपणे संपेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर बार्बाडोस विमानतळ मंगळवारी संध्याकाळपर्यंत सुरू होऊ शकेल. यानंतर, बार्बाडोसच्या स्थानिक वेळेनुसार, संपूर्ण संघ संध्याकाळी 6.30 वाजता भारतासाठी रवाना होईल आणि बुधवारी संध्याकाळी 7.45 वाजता दिल्लीत उतरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.