भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली आहे. बारबाडोसमध्ये पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी विजय मिळवला. यासह भारतीय संघाने दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली आहे. भारतीय संघाने १७ वर्षांची प्रतीक्षा संपवत आयसीसी टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली आहे.
या विजयानंतर बीसीसीआयने वर्ल्डकप विजेत्या संघावर पैशांचा वर्षाव केला आहे. या संघासाठी बीसीसीआयने बक्षीस म्हणून १२५ कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान जाणून घ्या वर्ल्डकप खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंची एकूण संपत्ती किती?
विराट कोहली हा भारतीय संघातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे. त्याची एकूण संपत्ती १०४६ कोटी इतकी आहे. तर संघाचा कर्णधार रोहित शर्माची एकूण संपत्ती २१४ कोटी इतकी आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आयपीएलमधून मोठी रक्कम मिळते. यासह जाहिरातीतूनही हे खेळाडू कोट्यवधींची कमाई करतात.
भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाची संपत्ती १२० कोटी इतकी आहे. तर रिषभ पंतची संपत्ती १० कोटींच्या घरात आहे. भारताचा उपकर्णधार हार्दिक पंड्याची एकूण संपत्ती ९१ कोटी रुपये इतकी आहे.
भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनची एकूण संपत्ती ८२ कोटी रुपये इतकी आहे. तर जसप्रीत बुमराहची संपत्ती ५५ कोटी आणि मोहम्मद सिराजची संपत्तीही इतकीच आहे.
अक्षर पटेलची एकूण संपत्ती ही ४९ कोटींच्या घरात आहे. तर युजवेंद्र चहलची संपत्ती ही ४५ कोटींच्या घरात आहे. भारताचा स्टार फलंदाज सूर्या कुमारच संपत्ती ३२ कोटी रुपये इतकी आहे.
कुलदीप यादवची संपत्ती ३२ कोटी, शिवम दुबेची संपत्ती २८ कोटी, यशस्वी जयस्वालची संपत्ती १० कोटी आणि अर्शदीप सिंगचीही संपत्ती १० कोटी रुपये इतकी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.