Ravindra Jadeja: रोहित-विराटनंतर अष्टपैलू रविंद्र जडेजाचा मोठा निर्णय; आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटला ठोकला 'रामराम'

Ravindra Jadeja T20 International Cricket: टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू रविंद्र जडेजानेही रोहित आणि विराटच्या पावलावर पाऊल टाकत मोठा निर्णय घेतलाय. त्याने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय.
Ravindra Jadeja: रोहित-विराटनंतर अष्टपैलू रविंद्र जडेजाचा मोठा निर्णय; आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटला ठोकला 'रामराम'
Ravindra Jadeja T20 International CricketTOI

भारताने टी-२० विश्वचषक २०२४चे विजेतेपद पटकावलं. टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत दुसऱ्यांदा टी२०चा विश्वकप घरी आणला. चॅम्पियन बनल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि विराटनंतर आता भारतीय संघातील ऑल राऊडर रविंद्र जडेजानेही निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय.

भारताने टी२० विश्वचषक- २०२४चे विजेतेपद जिंकताच अनुभवी फलंदाज विराट कोहलीने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. यानंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्मानेही टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. आता या यादीत रविंद्र जडेजाचेही नाव जोडलं गेलं आहे. जडेजाने रविवारी इंस्टाग्रामवर पोस्ट करून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची माहिती दिली.

भारताने टी२० विश्वचषक २०२४चे विजेतेपद जिंकताच अनुभवी फलंदाज विराट कोहलीने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. यानंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्मानेही टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. आता या यादीत रवींद्र जडेजाचेही नाव जोडलं गेलं आहे.

जडेजाने रविवारी इंस्टाग्रामवर पोस्ट करून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची माहिती दिली. मात्र जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जडेजा एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत राहणार असल्याचं त्याने म्हटलंय. २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध टी २० आंतरराष्ट्रीय मध्ये पदार्पण केल्यापासून त्याने ७४ सामने खेळलेत. यात ५१५ धावा केल्यात आणि ५४ विकेट त्याने घेतले आहेत.

दरम्यान शनिवारी झालेल्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. या विजयानंतर रोहित आणि कोहली या दोघांनीही टी२० फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्या निवृत्तीने एका युगाचा अंत झालाय.

Ravindra Jadeja: रोहित-विराटनंतर अष्टपैलू रविंद्र जडेजाचा मोठा निर्णय; आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटला ठोकला 'रामराम'
T20 World Cup: रोहित अन् विराट कोहलीसह या 2 दिग्गजांनीही घेतली T20I क्रिकेटमधून निवृत्ती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com