Rohit Sharma T20i Retirement : विराट कोहलीनंतर रोहित शर्माचाही मोठा निर्णय; टी२० विश्चचषकाच्या विजयानंतर जाहीर केली निवृत्ती

Rohit Sharma T20i Retirement News : विराट कोहलीनंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानेही आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
विराट कोहलीनंतर रोहित शर्माचाही मोठा निर्णय; टी२० विश्चचषकाच्या विजयानंतर जाहीर केली निवृत्ती
rohit sharma with virat kohlitwitter

मुंबई : भारताने शनिवारी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडियाने टी-२० विश्वचषकावर नाव कोरलं आहे. टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. देशातील क्रिकेटप्रेमी टी२० विश्वचषक जिंकण्याचा उत्साह साजरा करत असतानाच दोन दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर सुरुवातील विराट कोहलीने टी-२० क्रिकेट सामन्यातून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मानेही टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आयसीसीच्या अधिकृत 'एक्स' हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. आयसीसीने म्हटलं आहे की, 'विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

विराट कोहलीनंतर रोहित शर्माचाही मोठा निर्णय; टी२० विश्चचषकाच्या विजयानंतर जाहीर केली निवृत्ती
IND vs SA: इथेच सामना फिरला! सूर्याची अविश्वसनीय कॅच ठरली टीम इंडियासाठी टर्निंग पॉईंट; पाहा VIDEO

37 वर्षीय रोहित शर्माने संघाची कमान सांभाळत शनिवारी इतिहास रचला. टी२० विश्वचषकाच्या स्पर्धेत टी-२० विश्वचषक जिंकण्याचा मान भारताने पटकावला. भारताने चौथ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा मान पटकावला आहे.

टीम इंडियाने आज शनिवारी झालेल्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ७ धावांनी दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारली. या विजयासोबत टीम इंडियाने देशातील १४० कोटी लोकांना आनंदोत्सव साजरा करण्याची संधी दिली. क्रिकेट चाहते आनंदोत्सव साजरा करत असतानाच विराट कोहली आणि रोहित शर्माने टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

सामन्यानंतर रोहित शर्माने पत्रकार परिषदेत म्हटलं की, 'आजचा सामना माझा शेवटचा सामना होता. टी-२० क्रिकेटला अलविदा म्हणायला आजच्या सारखा दुसरा चांगला दिवस नाही. टी-२० विश्वचषक जिंकण्याचं माझं लक्ष्य होतं. मी आता शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. मला जसं वाटत होतं, तसंच झालं आहे. मी या क्षणासाठी आतुरतेने वाटत पाहत होतो. माझ्या आनंदाला आता सीमाच उरलेली नाही'.

विराट कोहलीनंतर रोहित शर्माचाही मोठा निर्णय; टी२० विश्चचषकाच्या विजयानंतर जाहीर केली निवृत्ती
IND vs SA, Final: संकटात मदतीला उभा ठाकला! फायनलमध्ये किंग कोहली अन् 'बापू'चा 'विराट' कारनामा

रोहित शर्माच्या विक्रमाविषयी बोलायचं झालं तर, त्याने १५९ टी२० आंतराष्ट्रीय सामन्यात भारतासाठी ३२.०५ ची सरासरी आणि १४०.८९ च्या स्टाइक रेटने ४२३१ धावा कुटल्या आहेत. त्याने टी२० विश्वचषकात ५ शतक आणि ३२ अर्धशतक ठोकले आहेत. तर रोहित शर्मा २००७ साली टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या संघात होता. रोहितने दोन-२० विश्वचषक जिंकून देण्याची लाखमोलाची साथ दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com