IND vs SA, Final: संकटात मदतीला उभा ठाकला! फायनलमध्ये किंग कोहली अन् 'बापू'चा 'विराट' कारनामा

Virat Kohli- Axar Patel Record: भारत आणि दक्षिण आफ्रिक या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या सामन्यात विराट कोहली आणि अक्षर पटेलने मोठा रेकॉर्ड केला आहे.
IND vs SA, Final: संकटात मदतीला उभा ठाकला! फायनलमध्ये किंग कोहली अन् 'बापू'चा 'विराट' कारनामा
virat kohli with axar patelTwitter

बारबाडोसच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना सुरु आहे. या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकला आणि दक्षिण आफ्रिकेला प्रथम गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना अक्षर पटेल आणि विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. दरम्यान दोघांनी मिळून एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय विराटने तर सार्थ ठरवला. मात्र दुसऱ्या बाजूने भारतीय संघाला लागोपाठ ३ मोठे धक्के बसले. केशव महाराजने दुसऱ्याच षटकात रोहितला बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर रिषभ पंतही याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतला. सूर्यकुमार यादवलाही या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. मात्र त्यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेलने संघाचा गाडा पुढे नेला आणि विक्रमी भागीदारी केली.

IND vs SA, Final: संकटात मदतीला उभा ठाकला! फायनलमध्ये किंग कोहली अन् 'बापू'चा 'विराट' कारनामा
T20 World Cup IND Vs SA: टॉस गेला की सामनाही गेला; असा रहिलाय टी२० वर्ल्डकपच्या फायनल सामन्याचा इतिहास

विराट- अक्षरची विक्रमी भागीदारी

या सामन्यात विराट कोहली आणि अक्षर पटेलने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी मिळून ७२ धावांची भागीदारी केली. भारतीय संघाने ३४ धावांवर ३ फलंदाज गमावले होते. या दोघांनी मिळून गौतम गंभीर आणि युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. या डावात अक्षर पटेलने ३१ चेंडूंचा सामना करत ४७ धावांची खेळी केली. तर विराट कोहली ७६ धावा करत माघारी परतला.

IND vs SA, Final: संकटात मदतीला उभा ठाकला! फायनलमध्ये किंग कोहली अन् 'बापू'चा 'विराट' कारनामा
IND vs SA : टीम इंडियाची टॉप ऑर्डर फ्लॉप; दिग्गज ३ फलंदाज तंबूत, विराट कोहली मैदानात तळ ठोकून

भारतीय संघाने केल्या १७६ धावा

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा ९ तर रिषभ पंत शून्यावर माघारी परतला. त्यानंतर सूर्या ३ धावा करत माघारी परतला. त्यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेलने भारतीय संघाचा डाव सांभाळला. अक्षर पटेलने ४७ आणि विराट कोहलीने ७६ धावांची खेळी केली. शेवटी शिवम दुबेने२७ आणि हार्दिक पंड्याने ५ धावा केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com