Virat Kohli : एकच नंबर! विराट कोहलीचा खणखणीत षटकार, दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूही पाहत राहिले, VIDEO

Virat Kolhi six video : टीम इंडियाची दिग्गज तंबूत परतले, त्यावेळी विराट कोहली संकटात धावून आला. विराट कोहलीने संयमाने खेळत टीम इंडियाचा डाव सावरला.
एकच नंबर! विराट कोहलीचा खणखणीत षटकार, दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूही पाहत राहिले, VIDEO
Virat Kohli :Saam tv
Published On

मुंबई : टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर मोठं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडिायाने दक्षिण आफ्रिकेसमोर १७६ धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाची टॉप ऑर्डरही फ्लॉप झाल्यानंतर विराट कोहलीने डाव सावरला. या सामन्यादरम्यान विराट कोहलीने खणखणती षटकार लगावला. विराटच्या षटकारानंतर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू पाहत पाहिले.

एकच नंबर! विराट कोहलीचा खणखणीत षटकार, दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूही पाहत राहिले, VIDEO
IND vs SA Final: निष्काळजीपणा नडला; अंतिम सामन्यातही ऋषभ पंत ठरला फ्लॉप

विराट कोहलीने फायनलमध्ये मार्को यानसेनच्या चेंडूवर गगनचुंबी षटकार लगावला. विराट कोहलीने लगावलेला षटकार थेट स्टेडिअम बाहेर गेला. टीम इंडियाने २० षटकात ७ गडी गमावून १७६ धावा केल्या.

विराटचा खणखणीत षटकार

विराट कोहलीने यानसेनच्या १९ व्या षटकात चार चेंडूत धिम्या गतीने चेंडू टाकला. त्यानंतर विराटने एक पाऊल पुढे टाकत विराट कोहलीने वाइड लाँग ऑनला ९५ मीटर लांब षटकार मारला.

एकच नंबर! विराट कोहलीचा खणखणीत षटकार, दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूही पाहत राहिले, VIDEO
Sourav Ganguly : 'टीम इंडिया आणखी एक वर्ल्डकप फायनल हरला तर रोहित समुद्रात उडी मारेल'; दिग्गज क्रिकेटरचं विधान

विराट कोहलीने लगावलेला षटकार थेट स्टेडिअमच्या बाहेर गेला. विराट कोहलीची बॅट या स्पर्धेत शांत होती. मात्र, फायनल सामन्यात विराटने आक्रमक रुप दाखवलं. विराट कोहलीने ५९ चेंडूत ६ चौकार, २ षटकार लगावत ७६ धावा लगावल्या.

एकच नंबर! विराट कोहलीचा खणखणीत षटकार, दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूही पाहत राहिले, VIDEO
IND vs SA, Final: नॉर्मल वाटलोय का? पहिल्याच षटकात विराटचे यान्सेनला 3 क्लासिक चौकार! पाहा VIDEO

कोहली व्यतिरिक्त अक्षरने ३१ चेंडूत एक चौकार आणि ४ षटकाराच्याा मदतीने ४७ धावा कुटल्या. विराट आणि अक्षर पटेलने मिळून ५२ चेंडूत ७२ धावांची खेळी खेळली. तर शिवम दुबेने १६ चेंडूत ३ चौकार आणि १ षटाकाराच्या मदतीने २७ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने सर्वाधिक केशव महाराज आणि एनरिक या दोघांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. रबाडा आणि यानसेन यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com