आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघात अंतिम सामना होत आहे. या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब राहिलीय. कर्णधार रोहित शर्मानंतर ऋषभ पंतदेखील मोठी खेळी करू शकला नाही. ऋषभ पंत हा क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये सर्वात स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. परंतु हा खेळाडू त्याच्या नावाप्रमाणे स्वत:ला सिद्ध करू शकलेला नाहीये. हे टी २० क्रिकेटमध्ये दिसून येत आहे.
२०२४ च्या टी २० विश्वचषकातही पंत आपल्या नावाची ओळख टिकू शकला नाही. पंतला संपूर्ण स्पर्धेत अर्धशतकही करता आले नाहीये. अंतिम सामन्यातही तो अपयशी ठरत त्याला साधे खातेही उघडता आले नाही. फायनलमध्ये निष्काळजीपणे फटका मारत पंतने आपली विकेट गमावलीय. दुसऱ्याच षटकात ऋषभ पंत मैदानात उतरला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू महाराज गोलंदाजी करत होता. त्याने पंतला फुल टॉस चेंडू टाकला. त्या चेंडूवर पंतने स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला आणि यष्टीरक्षकाच्या हाती झेल दिला. फुल टॉस बॉलवर पंतने अतिशय निष्काळजीपणाचा शॉट खेळला आणि शुन्यावर बाद झाला.
मात्र, पंत केवळ अंतिम फेरीतच अपयशी ठरला नाहीये. हा खेळाडू संपूर्ण स्पर्धेत फ्लॉप ठरला. या मोसमात पंतला टॉप ऑर्डरमध्ये संधी मिळाली. त्याला ३ क्रमांकाचे स्थान देण्यात आले आणि हा खेळाडू ८ सामन्यात २४.४२ च्या सरासरीने केवळ १७१ धावा करू शकला. एवढेच नाही तर पंतचा स्ट्राईक रेटही १२७ होता.
टीम इंडियाचा स्ट्राईक रेट चांगला असल्याची चर्चा अनेकदा होत असली तरी पंत यात सपशेल अपयशी ठरला. पंतला संधी देण्यासाठी टीम इंडियाने आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनला संपूर्ण स्पर्धेत संधी दिली नाही. पंतचा आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये खूप वाईट रेकॉर्ड आहे. त्याला ६३ टी-२० डावांमध्ये केवळ २३. १६ च्या सरासरीने ११५८ धावा करता आल्या, त्याचा स्ट्राइक रेटही १२६ राहिलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.