Pune Water Supply: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील 'या' भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद; पाहा VIDEO

Pune City Water Supply latest Update: विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये तांत्रिक कामे करण्यात येणार असल्याने पुणे शहरातील पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी देखील अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. वाचा सविस्तर.
Pune Water Supply: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील 'या' भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद; वाचा सविस्तर....
Pune City Water Supply latest Update:Saamtv

अक्षय बडवे पुणे, ता. २ जुलै २०२४

पुणेकरांसाठी सर्वात महत्वाची अन् मोठी बातमी. पुणे शहरात येत्या गुरुवारी काही परिसरामध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये तांत्रिक कामे करण्यात येणार असल्याने पुणे शहरातील पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी देखील अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. शहरातील पेठा, हडपसर, येरवडा, कोथरूड, कोंढवा, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता शहराच्या बहुतांश सर्व भागातील पाणी पुरवठा गुरुवारी राहणार बंद राहणार आहे.

शहरातील खडकवासला जॅक्वेल (नवीन), नवीन पर्वती जलशुध्दीकरण केंद्र (५०० एम.एल.डी.) जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर, पर्वती एलएलआर टाकी परिसर, पर्वती टँकर पॉईंट, लष्कर जलकेंद्र, एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) परिसर व चतुश्रुंगी टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परीसर व भामा आसखेड जॅक्वेल येथील विद्युतपंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम आहे.

Pune Water Supply: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील 'या' भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद; वाचा सविस्तर....
Parliament Session: संसदेत पुन्हा घमासान! PM मोदी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देणार; राहुल गांधींच्या आरोपांवर काय बोलणार?

त्यामुळे या परिसराच्या अंतर्गत येणाऱ्या भागातील पाणीपुरवठा पुर्णपणे बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Pune Water Supply: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील 'या' भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद; वाचा सविस्तर....
Pune Fake Police VIDEO : क्रिकेट चाहत्यांना मारहाण करणाऱ्या तोतया पोलीसाला फरासखाना पोलीसांनकडून अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com