कल्याणमध्ये दोन बहिणी बेपत्ता झाल्याची तक्रार
पोलिस तपासात दोघी सुरक्षित सापडल्या
लव्ह जिहादचा कोणताही पुरावा आढळला नाही
घरगुती वाद व त्रासामुळे घर सोडल्याचा आरोप
पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू
संघर्ष गांगुर्डे, कल्याण
Kalyan Chinchpada Missing Girl Update कल्याणमध्ये काही दिवसांपासून दोन सख्ख्या बहिणी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी गांभीर्यता लक्षात घेऊन सगळ्या अँगलने तपास करून दोन मुलींना शोधून काढले आहे. सुरुवातीला या दोघींना एका मुस्लिम तरुणाने बेपत्ता केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच हे प्रकरण लव्ह जिहादशी संबंधित असल्याची चर्चा रंगली होती. मात्र पोलीस चौकशीत धक्कादायक कारण समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील एका चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणी घरातील दागिने घेऊन अचानक बेपत्ता झाल्या. कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता त्यांना मुली सापडल्या नाहीत. दरम्यान या प्रकरणी पोलीस ठाण्यात मुली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी घटनेची खोली लक्षात घेऊन तातडीने तपासाला सुरुवात केली. सुरुवातीला सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे हे हे प्रकरण लव्ह जिहादशी संबंधित असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र या दोन्ही मुली आपल्या मित्रांच्या घरी सुरक्षित असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता दोघींनीही धक्कादायक खुलासा केला.
सावत्र आई आणि वडील सातत्याने मारहाण करतात तसेच शिक्षण घेऊ देत नाहीत, असा आरोप दोन्ही मुलींनी केला आहे. घरातील सततच्या त्रासाला कंटाळून आम्ही स्वतःहून घर सोडले, असे त्यांनी स्पष्टपणे पोलिसांना सांगितले. या प्रकरणात लव्ह जिहाद असा कोणताही प्रकार नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले आहे.तसेच आम्हाला आमच्या आई-वडिलांसोबत राहायचे नाही, असा निर्णयही दोघींनी पोलिसांसमोर व्यक्त केला आहे. मुलींच्या या भूमिकेमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.