RO RO Ferry : येवा कोकण आपलोच असा! ना वाहतूककोंडी, ना खराब रस्ते; मुंबईहून कोकणात फक्त ६ तासात, सुरू झाली रो-रो फेरी

Mumbai Vijaydurg Ro Ro Ferry Nitesh Rane : मुंबई ते विजयदुर्ग रो रो फेरी सेवा आजपासून सुरू होणार असून या सेवेमुळे अवघ्या ६-७ तासांत सागरी प्रवास शक्य होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या असून मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सेवेचा शुभारंभ आज होणार आहे.
RO RO Ferry : येवा कोकण आपलोच असा! ना वाहतूककोंडी, ना खराब रस्ते; मुंबईहून कोकणात फक्त ६ तासात, सुरू झाली रो-रो फेरी
Mumbai Vijaydurg Ro Ro Ferry Nitesh RaneSaam Tv
Published On

कोकण वासियांसाठी आनंदाची बातमी! बहुप्रतिक्षित मुंबई ते विजयदुर्ग ही रो-रो सेवा आजपासून सुरु होत आहे. या सेवेमुळे प्रवास वेगवान होणार असून या सेवेमुळे रेल्वेवरील गर्दीचा भार हलका होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सेवेला शुभेच्छा दिल्या आहेत. या रो रो सेवेमुळे सागरी वाहतुकीला चालना मिळणार आहे. आज सकाळी आठ वाजता नितेश राणे हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई–विजयदुर्ग एम.टी.एम बोट फेरीचा अर्थात रो-रो जलवाहतूक सेवेला शुभेच्छा देत कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. या खात्याचे मंत्री नितेश राणे यांच्या च्या ट्विटला रि-ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी या बहुप्रतिक्षित सेवेच्या शुभारंभाचे स्वागत केले.

RO RO Ferry : येवा कोकण आपलोच असा! ना वाहतूककोंडी, ना खराब रस्ते; मुंबईहून कोकणात फक्त ६ तासात, सुरू झाली रो-रो फेरी
Ambernath : सरकारी नोकरीच स्वप्न अधुरं राहिलं, तरुणीने राहत्या घरात संपवलं जीवन; सुसाईड नोटमुळे धक्कादायक कारण उघडं

आज १ मार्च होळीच्या पूर्वसंध्येला मुंबई ते सिंधुदुर्गातील विजयदुर्ग दरम्यान एम-टू-एम रो-पॅक्स फेरी सेवा अधिकृतपणे सुरू होत आहे, या सेवेच्या माध्यमातून अवघ्या ६ ते ७ तासांत सागरी मार्गाने प्रवास शक्य होणार आहे. कोकणवासीयांना जलद, आरामदायी आणि आनंददायी प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

ही सेवा कोकण आणि मुंबई सागरी दळणवळणासाठी ऐतिहासिक टप्पा मानली जात आहे. मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाला असून, मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छांमुळे या प्रकल्पाचे राज्याच्या विकासदृष्टीनं असलेले महत्त्व अधोरेखित झाले आहे. दरम्यान आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत या एम टू एम सेवेला प्रारंभ होणार आहे. आज सकाळी आठ वाजता नितेश राणे हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com