Sunil narine creates big record in ipl  google
Sports

Sunil Narine Record: शून्यावर बाद होऊनही सुनील नरेनचा मोठा कारनामा! असा रेकॉर्ड करणारा ठरला तिसराच खेळाडू

KKR vs MI, Sunil Narine Record: कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात सुनील नरेनच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

कोलकाताच्या इडन गार्डन्सवर मुंबई इंडियन्स संघाला कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. पावसामुळे हा सामना १६-१६ षटकांचा खेळवण्यात आला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून सुनील नरेनला हवी तशी कामगिरी करता आली नाही. तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला. दरम्यान गोलंदाजी करताना त्याने १ गडी बाद केला. यासह त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

सुनील नरेनने आतापर्यंत या हंगामात दमदार खेळ करून दाखवला आहे. त्याने गोलंदाजीसह फलंदाजीतही जीव ओतला आहे. त्याच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने १२ सामन्यांमध्ये ४६१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि ३ अर्धशतक झळकावले असून १०९ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली आहे. यासह गोलंदाजीतही त्याची जादू पाहायला मिळाली आहे. त्याने १५ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली आहे.

असा रेकॉर्ड करणारा तिसराच खेळाडू

सुनील नरेन हा आयपीएल स्पर्धेच्या एकाच हंगामात १५ गडी बाद करणारा आणि ४०० धावा तिसराच खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी हा कारनामा जॅक कॅलिस आणि शेन वॉटसनने करून दाखवला आहे. राजस्थान रॉयल्स संघाचं प्रतिनिधित्व करत असताना शेन वॉटसनने २००८ मध्ये ४७२ धावा करत १७ गडी बाद केले होते. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना जॅक कॅलिसने २०१२ मध्ये झालेल्या स्पर्धेत ४०९ धावा करत १५ गडी बाद केले होते.

कोलकाताचा विजय

पावसामुळे उशिराने सुरू झालेला हा सामना १६-१६ षटकांचा खेळवण्यात आला. या सामन्यात हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने १५७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाला १३९ धावा करता आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याण पूर्वेत चिंचपाडा १०० फूट रोडवर उभ्या कारला आग

Osteoporotic spine fracture: ऑस्टियोपोरोटिक स्पाइन फ्रॅक्चरचं निदान कसं केलं जातं? तज्ज्ञांनी सांगितलं कोणती काळजी घ्याल

Walking Fitness Routine: खरचं १०,००० पाऊलं चालण्याने शरीरात हे चमत्कारीक बदल होतात का?

Guru Gochar 2026: 12 वर्षांनंतर गुरु करणार सूर्याच्या राशीत प्रवेश; या राशींना मिळणार चांगली नोकरी आणि पैसा

Green Chutney Recipe : 'सँडविच'ची चव वाढवणारी 'हिरवी चटणी' घरी कशी बनवाल? वाचा परफेक्ट रेसिपी

SCROLL FOR NEXT