भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने (Shubman Gill) गेल्या काही महिन्यात दमदार खेळ केल्याचे पाहायला मिळाले आहे. गिलची ही कामगिरी पाहता त्याचा 'स्पोर्ट्स लिडर ऑफ द ईयर' (Sports Leader Of The Year Award)या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार त्याला केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्या हस्ते देण्यात आला आहे. शुभमन गिलने २०२३ मध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून सर्वाधिक धावा केल्या आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत.
शुभमन गिलची दमदार कामगिरी..
शुभमन गिलने २०२३ मध्ये आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे.तो यावर्षी वनडे,कसोटी आणि टी-२० मध्ये मिळून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. गिलच्या या वर्षातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ४५ सामन्यांमध्ये ५०.४२ च्या सरासरीने २११८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ७ शतक आणि १० अर्धशतक झळकावली आहेत. २०८ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. त्याने फलंदाजीत २२७ चौकार आणि २८ षटकार मारले आहेत.
वनडेत सर्वाधिक धावा..
शुभमन गिल आयसीसी वनडे फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. २०२३ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे. यावर्षी त्याला भारतीय संघाकडून २९ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ६३.२६ च्या सरासरीने १५८४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५ शतक आणि ९ अर्धशतक झळकावली आहेत. (Latest sports updates)
गुजरातच्या कर्णधारपदाची जबाबदारी..
आयपीएल २०२३ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेपूर्वी मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या २ हंगामात गुजरात टायटन्सच्या नेतृत्वाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे होती.
मात्र आगामी हंगाम सुरु होण्यापूर्वी हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्समध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी हंगामासाठी शुभमन गिलची गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.