आगामी आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी मोठा फेरबदल पाहायला मिळाला आहे. गुजरात टायटन्सला पहिल्या हंगामात फायलन जिंकून देणारा आणि दुसऱ्या हंगामात फायनलमध्ये पोहचवणाऱ्या हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात प्रवेश केला आहे.
आगामी हंगामात तो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना दिसून येणार आहे. कर्णधारपदाची जागा रिकामी होताच गुजरात टायटन्स संघाची जबाबदारी युवा फलंदाज शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. ही जबाबदारी मिळताच त्याने नेतृत्वाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. (Sports News In Marathi)
गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये शुभमन गिल (Shubman Gill) नेतृत्वाबाबत भाष्य करताना दिसून येत आहे. गिल म्हणाला की,'अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कर्णधारपदाशी निगडीत आहेत. बांधिलकी ही त्यापैकी एक आहे. शिस्त आणि कठोर परिश्रम त्यापैकी एक आहे. तसेच प्रामाणिकपणा हे देखील त्यापैकी एक आहे.' हे वक्तव्य करत त्याने गुजरातचा माजी कर्णधार हार्दिक पंड्यावर निशाणा साधला आहे, असं म्हटलं जात आहे.
तसेच तो पुढे म्हणाला की,'मी अनेक दिग्गज खेळाडूंच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे. यादरम्यान मला खूप काही शिकायला मिळालं आहे. दिग्गज खेळाडूंच्या नेतृत्वाखाली खेळताना मी जे काही शिकलो आहे, त्याचा मला आयपीएलमध्ये नक्कीच फायदा होईल.' (Latest sports updates)
गुजरात टायटन्स संघाचा सर्वात यशस्वी फलंदाज...
शुभमन गिल हा आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्या दमदार फलंदाजीच्या बळावर गुजरात टायटन्सने पहिल्याच हंगामात जेतेपदाला गवसणी घातली होती. फलंदाज म्हणून शुभमन गिल सुपरहिट आहे. मात्र कर्णधार म्हणून तो कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.