SRH Vs GT Highlights x
Sports

SRH Vs GT Highlights : गुजरातनं घरच्या मैदानावर हैदराबादला लोळवलं, SRH चा सलग चौथा पराभव

SRH Vs GT Match Match Highlights : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यामध्ये गुजरातचा ७ विकेट्सनी विजय झाला आहे. हा गुजरात टायटन्सचा आयपीएल २०२५ मधला सलग तिसरा विजय आहे.

Yash Shirke

SRH Vs GT IPL 2025 : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यामध्ये गुजरातचा विजय झाला आहे. गुजरातच्या संघाने ७ गडी राखून हैदराबादला पराभवाचे पाणी पाजले आहे. हा सनरायजर्स हैदराबादचा सलग चौथा पराभव आहे. दुसऱ्या बाजूला गुजरात टायटन्सने सलग तिसरा विजय आहे.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज सनरायजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स ही लढत रंगली. गुजरात संघाचा कर्णधार शुबमन गिलने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सनरायजर्स हैदराबादने २० ओव्हर्समध्ये एकूण १५२ धावा केल्या.

गुजरातच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच सामन्यावर घट्ट पकड ठेवली. सलामीवीरांपासून ते मध्यम फळीपर्यंत प्रत्येक खेळाडू लवकर माघारी परतले. त्यातल्या त्यात नितीश कुमार रेड्डीने ३१ आणि क्लासेनने २७ धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये आलेल्या कर्णधार पॅट कमिन्सचे फटकेबाजी करत २२ धावा केल्या. सिराजने ४ विकेट्स, तर प्रसिद्ध कृष्णा-साई किशोरने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.

गोलंदाजीसाठी उतरल्यानंतर शमीने इनफॉर्म साई सुदर्शनची विकेट घेतली. जॉस बटलर सुद्धा शून्यावर बाद झाला. काही वेळासाठी सामना हैदराबादच्या बाजूला गेला असे म्हटले जात होते. पण त्यानंतर कर्णधार शुबमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदरने खेळ सावरला. वॉशिंग्टन ४९ धावा करुन माघारी परतला. शुबमन गिलने ६१ तर रुदरफोर्टने ३५ धावा करत गुजरातला विजय मिळवून दिला.

सनरायजर्स हैदराबादची प्लेईंग 11 :

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, कामिंदुने मेंडिस, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, मोहम्मद शमी.

गुजरात टायटन्सची प्लेईंग 11 :

साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, राशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, वर्षभर एसटी प्रवास मोफत

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT