

सोन्याचे दर वाढणार की कमी होणार ?
इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम
डॉलर घसरल्यावर आपोआप सोनं स्वस्त होणार
जागतिक पातळीवर सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम जगावर होत आहे. इंधनासह आता धातूच्या किंमतीदेखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सोन्याचे दर भविष्यातदेखील असेच वाढत राहतील, असं सांगितलं आहे. लवकरच सोन्याचे दर २ लाखांपर्यंत पोहचण्याची भीती आता सर्वसामान्यांना वाटत आहे. सोन्याचे दर २ लाखांपर्यंत कधीही पोहचू शकतात. हे दर सध्या १,८० ,००० रुपयांपर्यंत पोहचले आहेत.
सोन्याचे दर गगनाला भिडले (Gold Rate Hike Today)
MCX नुसार सोन्याचे दर १० ग्रॅममागे १,६१,६७५ रुपये आहेत. हे दर १,८०,७७९ पेक्षा फक्त १८,००० रुपयांनी कमी आहेत. आतापर्यंत सोन्याचे सर्वाधिक दर १ लाख ८० हजारांच्या घरात होते. आता लवकरच सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ होऊ शकते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते की, इराणसोबतचे युद्ध लवकरत संपू शकते. यामुळे जागतिक पातळीवर तणाव कमी होईल. यानंतर अमेरिकन डॉलरमध्ये घसरण पाहायला मिळाली. कच्च्या तेलाच्या किंमतीदेखील किंचिंत कमी झाल्या आहेत. यानंतर सोन्याचे दरदेखील थोड्या प्रमाणात घसरल्याचे पाहायला मिळत आहे.
डॉलरचे दर घसल्याने सोनं स्वस्त होते. तेलाच्या किंमती कमी झाल्याने महगाई होण्याची शक्यता कमी असते. यामुळे मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवण्याची शक्यतादेखील कमी होऊ शकते. यामुळे सोन्याच्या किंमतीवर चांगला परिणाम होऊ शकतो.परंतु यासाठी जागतिक पातळीवरील युद्ध थांबायला हवे.
सोन्याचे दर २ लाखांपर्यंत जाणार
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सोन्याचे दर खूप जास्त आहे. सध्याच्या दृष्टीकोनातून सोन्याचे दर नवा उच्चांक गाठण्याऐवजी कंसोलिडेशन होऊ शकते. जर राजकीय तणाव कमी झाला तर डॉलरची किंमत कमी होऊ शकते. यामुळे लिक्विडेश कमी होऊ शकते. परिणामी सोन्याचे दर स्थिर होऊ शकतात. त्यामुळे युद्धावर सोन्याचे दर अवलंबून आहेत.
याउलट जर तणाव कायम राहिला तर वित्तीय बाजारपेठेत अस्थिरता निर्माण होऊ शकते. यामुळे सोन्याचे दर वाढू शकतात. जेपी मॉर्गनने सोन्याच्या किंमतीचा अंदाज लावला आहे. त्यांच्या म्हणण्यांनुसार सोन्याचे दर १५ टक्क्यांनी वाढवून ४,५०० डॉलर प्रति औंस केले तर २०२६ च्या अखेरपर्यंत ६,३०० डॉलर होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.