Gold Rate Today: आजही सोन्याचे दर घसरले! प्रति तोळा इतक्या रुपयांना मिळणार; वाचा 22k, 24k गोल्डची किंमत

Gold Rate Today Fall: आज सोन्याचे दर घसरले आहेत. प्रति तोळ्यामागे फक्त १० रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर आज किती झाले आहेत ते जाणून घ्या.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam Tv
Published On
Summary

सोन्याचे दर आज पुन्हा घसरले

प्रति तोळ्यामागे किती रुपयांची घसरण?

वाचा आजचे सोन्याचे दर

सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात मागच्या आठवड्यातही घसरण झाली होती. सतत घसरण होत असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात आज २४ कॅरेटमागे १० रुपयांची घसरण झाली आहे. आज १ तोळा सोन्याचे दर १,६२,८७० रुपये आहेत. सोन्याचे दर काल जवळपास १००० रुपयांनी घसरले होते. त्यानंतर आज फक्त १० रुपयांनी घसरले आहेत. भविष्यातदेखील सोन्याच्या दरात घसरणीची अपेक्षा सर्वसामान्यांना आहे.

Gold Rate Today
Gold Price: इराण युद्धाचा परिणाम! सोनं-चांदीला चकाकी, २४ तासांत सोनं ११००० तर चांदी २५००० रुपयांनी वाढले

आजचे सोन्याचे दर वाचा (Today Gold Rate)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १,६२,८७० रुपये आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १,३०,२९६ रुपये आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १६,२८,७०० रुपये झाले आहेत. या दरात १०० रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे.

२२ कॅरेटचे दर (22K Gold Rate)

आज २२ कॅरेटचे दरदेखील प्रति तोळ्यामागे १० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,४९,२९० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ८ रुपयांनी घसरुन १,१९,४३२ रुपयांवर विकले जात आहे. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १०० रुपयांनी घसरले असून १४,९२,९०० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold Price Today: गुड न्यूज! सोनं ४९०० रुपयांनी स्वस्त, २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?

१८ कॅरेटचे दर (18K Gold Rate)

१८ कॅरेट सोन्याचे दरदेखील १ तोळ्यामागे १० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,२२,१५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ८ रुपयांनी घसरले असून हे दर ९७,७२० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १२,५१,५०० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold-Silver Price: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी ३००० रुपयांनी स्वस्त; १ तोळा सोन्याचा भाव किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com