Gold Price Today: गुड न्यूज! सोनं ४९०० रुपयांनी स्वस्त, २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?

Gold Prices Drop: सोन्याच्या दरामध्ये सलग दुसऱ्यादिवशी मोठी घसरण झाली. त्यामुळे आज सोनं खरेदीची चांगली संधी आहे. आज १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर किती आहेत ते जाणून घ्या नंतर खरेदी करायला जा....
Gold Price Today: गुड न्यूज! सोनं ४९०० रुपयांनी स्वस्त, २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?
Gold Price TodaySaam Tv
Published On

Summary -

  • सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली

  • १० तोळा सोनं तब्बल ४,९०० रुपयांनी स्वस्त झालं

  • २४, २२ आणि १८ कॅरेट सर्व प्रकारच्या सोन्याचे दर कमी झाले

  • होळीनंतर ग्राहकांसाठी सोनं खरेदीची सुवर्णसंधी

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. होळीच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. आजही सोन्याचे दर घसरल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज सोनं खरेदीची चांगली संधी आहे. आज १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ४,९०० रुपयांनी घसरण झाली आहे. आज सोनं खरेदी करायला जाण्यापूर्वी १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर ४९० रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी १,७०,०२० रुपये खर्च करावे लागणार आहेत. सोमवारी या सोन्याचा दर १,७०,५१० रुपये होता. तर २४ कॅरेटचे १० तोळा सोनं ४,९०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १७,००,२०० रुपये खर्च करावे लागणार आहे. सोमवारी हे सोनं १७,०५,१०० रुपयांना विकले गेले.

Gold Price Today: गुड न्यूज! सोनं ४९०० रुपयांनी स्वस्त, २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?
Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! प्रतितोळा ₹१७१००० वर पोहचले, आठवड्यात कधी स्वस्त, कधी महाग? वाचा सविस्तर

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ४५० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,५५,८५० रुपये खर्च करावे लागणार आहे. सोमवारी या सोन्याचा दर १,५६,३०० रुपये होता. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ४,५०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १५,५८,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. सोमवारी हे सोनं १५,६३,००० रुपयांना विकले गेले.

Gold Price Today: गुड न्यूज! सोनं ४९०० रुपयांनी स्वस्त, २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?
Gold Price: इराण युद्धाचा परिणाम! सोनं-चांदीला चकाकी, २४ तासांत सोनं ११००० तर चांदी २५००० रुपयांनी वाढले

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील घसरण झाली आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३६० रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,२७,५२० रुपये खर्च करावे लागतील. सोमवारी या सोन्याचा दर १,२७,८८० रुपये होता. तर आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३,६०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,२७,५२० रुपये खर्च करावे लागणार आहेत. सोमवारी हे सोनं १२,७८,८०० रुपयांना विकले गेले.

Gold Price Today: गुड न्यूज! सोनं ४९०० रुपयांनी स्वस्त, २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?
Gold Price Today: होळीआधी सोन्याच्या दरात मोठी वाढ, १० तोळ्यामागे ३१,६०० रुपयांची वाढ, २२-२४ कॅरेटचे आजचे दर किती?

२४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे तुमच्या शहरातील आजचे दर किती?

मुंबई - १७,००२ रुपये

पुणे - १७,००२ रुपये

चेन्नई - १७,०७३ रुपये

बंगळुरू - १७,००२ रुपये

दिल्ली - १७,०१७ रुपये

अहमदाबाद - १७,००७ रुपये

कोलकाता - १७,००२ रुपये

२२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे तुमच्या शहरातील आजचे दर किती?

मुंबई - १५,५८५ रुपये

पुणे - १५,५८५ रुपये

चेन्नई - १५,६५० रुपये

बंगळुरू - १५,५८५ रुपये

दिल्ली - १५,६०० रुपये

अहमदाबाद - १५,५९० रुपये

कोलकाता - १५,५८५ रुपये

१८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे तुमच्या शहरातील आजचे दर किती?

मुंबई - १२,७५२ रुपये

पुणे - १२,७५२ रुपये

चेन्नई - १२३,४०० रुपये

बंगळुरू -१२,७५२ रुपये

दिल्ली - १२,७६७ रुपये

अहमदाबाद - १२,७५७ रुपये

कोलकाता - १२,७५२ रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com