इराण-इस्राइल युद्धाचा थेट परिणाम सोनं-चांदीच्या दरांवर झाला
जळगाव सराफा बाजारात सोनं-चांदीला चकाकी
२४ तासांत सोनं ११,००० आणि चांदी २५,००० रुपयांनी महागली
लग्नसराईच्या काळात दरवाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशावर ताण
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं-चांदीला चांगलीच चकाकी आली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या युद्धामुळे थेट परिणाम सोनं आणि चांदीच्या दरावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये गेल्या २४ तासांमध्ये सोन्याच्या दरामध्ये ११,००० रुपयांची वाढ झाली तर चांदीच्या दरामध्ये २५,००० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
२०२६ या वर्षाच्या सुरुवातीलाच सोनं आणि चांदीने उच्चांक गाठल्याचे ग्राहकांनी अनुभवले. त्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आणि ग्राहकांना कुठेतरी दिलासा मिळाला होता. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीचे दरात घसरण होत असल्याचे पाहायला मिळाले. पण त्यानंतर सोन्याचे दर वाढतच चालले आहेत. अमेरिका- इस्राइलने संयुक्तरित्या इराणवर हल्ले केले. या देशांमध्ये युद्ध सुरू झाले आहे. या युद्धाचा मोठा परिणाम सोनं-चांदीच्या दरांवर झाला आहे.
जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये गेल्या २४ तासांमध्ये सोन्याच्या दरात ११००० रुपयांनी आणि चांदीच्या दरामध्ये २५,००० रुपयांनी वाढ झाली आहे. अचानक सोनं-चांदीच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे. सोनं-चांदीच्या वाढत्या दरांमुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. लग्नसराईदरम्यान सोनं-चांदीचे दर वाढत असल्यामुळे ते खरेदी करताना ग्राहकांच्या खिशावर ताण येणार आहे.
सोनं-चांदीच्या दराने पुन्हा उच्चांक गाठला आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा दर जीएसटीसह १ लाख ७५ हजारांहून अधिक झाला आहे. तर चांदीचा दर जीएसटीसह ३ लाख ३ हजार रुपये इतका झाला आहे. भविष्यात इराण- इस्राइलमधील युद्धजन्य परिस्थिती जर अशीच कायम राहिली तर सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.