Gold Rate Today: युद्धामुळे दर गगणाला भिडणार! सोनं प्रति तोळा ₹९४३० ने वाढले, तर चांदीला २०,००० रुपयांची चकाकी, वाचा आजचे दर

Gold Rate Weekly Price Update: सोन्याचे दर खूप जास्त वाढले आहेत. आठवड्याभरात जवळपास साडे नऊ हजारांनी वाढ झाली आहे. सोन्याचे दर वाढल्याने खरेदीदारांच्या खिशाला फटका बसत आहे.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam tv
Published On
Summary

सोन्याच्या दरात आठवड्याभरात चांगलीच वाढ

आठवड्याभरात सोनं ९,५०० रुपयांनी महागलं

सोन्यासोबतच चांदीही महागली

सोने-चांदीच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून बदल होताना दिसत आहे.सोन्याचे दर मध्यंतरी कमी झाले होते मात्र, आता पुन्हा सोन्याचे दर वाढले आहेत. पुढच्या आठवड्यात सोन्याचे दर खूप वाढण्याची शक्यता आहे. इराण-इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मागच्या आठवड्यात सोन्याचे दर जवळपास साडे नऊ हजारांनी वाढले आहेत. त्यामुळे खरेदीदारांच्या खिशाला फटका बसत आहे. फेब्रुवारी महिन्यात १० तोळा सोन्याचे दर जवळपास ८१,००० रुपयांनी वाढले आहेत.

Gold Rate Today
Gold Rate Today : होळीआधी गूड न्यूज! सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर कोसळले; वाचा 24K, 22K आणि 18K गोल्ड रेट

मागच्या एका आठवड्यात २४ कॅरेट सोन्याचे दर ९४३० रुपयांनी वाढले आहेत. २२ कॅरेट सोन्याचे दर ८५५० रुपयांनी वाढले आहेत. आज मुंबईत सोन्याचे दर जवळपास १६८७१० रुपयांनी वाढले आहेत. सोन्याचे दर आठवड्याभरात खूप तेजीत वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर ५१७२.१७ डॉलर प्रति औंसवर आहे. १० तोळे सोन्याचे दर ८०,००० रुपयांनी वाढले आहेत.

देशभरातील सोन्याचे दर (Gold Rate Today)

मुंबईत २४ कॅरेट सोन्याचे दर १६८७१० रुपये प्रति तोळ्यावर विकले जात आहे. २२ कॅरेटचे दर १५४६३० रुपये प्रति तोळा आहे.

दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचे दर १६८८६० रुपये झाले आहेत. २२ कॅरेट सोन्याचे दर १ तोळ्यामागे १५४८०० रुपये झाले आहेत.

पुणे आणि बंगळुरुमध्ये २४ कॅरेट सोन्याचे दर १६८७१० रुपये झाले आहेत. २२ कॅरेट सोन्याचे दर १ तोळ्यामागे १५४६३० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold, Silver Rate: बाजारातील चमक उडाली! सोन्यासह चांदीचे दर घसरले; चांदीच्या किमतीत ११,००० रुपयांची घसरण, जाणून घ्या आत्ताचे नवे दर

चांदीचे दर

चांदीच्या दरातदेखील चांगलीच वाढ पाहायला मिळणार आहे. चांदीचे दर आठवड्याभरात २०,००० रुपयांनी वाढले आहेत. आज चांदीचे दर २९५००० रुपये आहेत. शुक्रवारी सोन्याचे दर २,५०० रुपयांनी वाढले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर ८९.७२ डॉलर प्रति औंसवर विकले जात आहे.

Gold Rate Today
Todays Gold Rate: इस्रायल-इराण युद्धाचा भडका; सोने आणि आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ, जाणून घ्या आत्ताचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com