Gold Rate Today: सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ५५०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Gold Rate Today Hike: सोन्याचे दर आज पुन्हा वाढले आहेत. काल सोन्याचे दर घसरले होते त्यानंतर आज पुन्हा हे दर वाढले आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करावं की नाही असा प्रश्न खरेदीदारांना पडला आहे.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam Tv
Published On
Summary

सोन्याचे दर पुन्हा वाढले

प्रति तोळ्यामागे ५५० रुपयांची वाढ

सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

सोन्याचे दर गेल्या अनेक दिवसांपासून कमी-जास्त होत आहेत. सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होत असल्याने खरेदीदारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. सोनं खरेदी करावं की नाही असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, काल सोन्याचे दर अचानक घसरले होते. आठवड्याभराच्या दरवाढीनंतर सोन्याच्या दरात घसरण झाली होता. त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला होता. यानंतर आता सोन्याचे दर घसरतील, अशी आशा होती. मात्र, सोन्याचे दर आज चांगलेच वाढले आहेत.

Gold Rate Today
Gold Rate Today: सोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी वाढले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे भाव

सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे. १ तोळ्यामागे सोन्याचे दर ५५० रुपयांनी वाढले आहेत. सोन्याने पुन्हा एकदा १.६० लाखांचा आकडा पार केला आहे. हे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीयेत. त्यामुळे अनेकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहेत. जाणून घ्या आजचे सोन्याचे दर

आजचे सोन्याचे दर (Gold Rate Today)

२४ कॅरेटचे दर (24k Gold Rate)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ५५० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,६१,५७० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्यामागे ४४० रुपयांची वाढ झालू आहे हे दर १,२९,२५६ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ५,५०० रुपयांनी वाढले आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold rATE)

२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ५०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १,४८,१०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ४०० रुपयांनी वाढून १,१८,४८० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे ५००० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १४,८१,००० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold Price Today: सोन्याने पुन्हा भाव खाल्ला, १० तोळ्यामागे २०,७०० रुपयांची वाढ; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?

१८ कॅरेटचे दर (18k Gold Rate)

१८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ४१० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,२१,१८० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ३२८ रुपयांनी वाढले असून ९६,९४४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ४,१०० रुपयांनी वाढले असून १२,११,८०० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold Rate: खरेदीदारांना दिलासा! आठवड्याभरानंतर सोन्याचे दर घसरले; वाचा १ तोळ्याचे भाव किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com