Gold Price Today: सोन्याने पुन्हा भाव खाल्ला, १० तोळ्यामागे २०,७०० रुपयांची वाढ; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?

Gold Silver Price Hike: सोनं-चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळे आज सोनं-चांदी करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. १० तोळा सोन्यामागे २०,७०० रुपयांची वाढ झाली. आजचे २४ आणि २२ कॅरेटचे दर किती? वाचा...
Gold Price Today: सोन्याने पुन्हा भाव खाल्ला, १० तोळ्यामागे २०,७०० रुपयांची वाढ; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?
Gold Price TodaySaam Tv
Published On

Summary -

  • आज सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली

  • १० तोळा सोनं २०,७०० रुपयांनी महागले

  • २४ कॅरेटपाठोपाठ २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली

  • चांदीचे दरही २५ रुपयांनी प्रति ग्रॅमने वाढले

सोनं-चांदीच्या दरामध्ये पुन्हा मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज १० तोळा सोन्याच्या दरात तब्बल २०,७०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १ ग्रॅम चांदीचे दर २५ रुपयांनी वाढले आहे. आज सोनं-चांदी खरेदी करताना ग्राहकांच्या खिशावर ताण येणार आहे. सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर २,०७० रुपयांनी वाढले आहे. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी १,६१,३५० रुपये खर्च करावे लागणार आहेत. रविवारी १ तोळा सोनं १,५९,२८० रुपयांना विकले गेले. तर २४ कॅरेटचे १० तोळा सोनं तब्बल २०,७०० रुपयांनी महाग झाले आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १६,१३,५०० रुपये खर्च करावे लागणार आहे. रविवारी हेच सोनं १५,९२,८०० रुपयांना विकले गेले.

Gold Price Today: सोन्याने पुन्हा भाव खाल्ला, १० तोळ्यामागे २०,७०० रुपयांची वाढ; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?
Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,९०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,४७,९०० रुपये खर्च करावे लागणार आहे. रविवारी हे सोनं १,४६,००० रुपयांना विकले गेले. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १९,००० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १४,७९,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत. शुक्रवारी हे सोनं १४,६०,००० रुपयांना विकले गेले.

Gold Price Today: सोन्याने पुन्हा भाव खाल्ला, १० तोळ्यामागे २०,७०० रुपयांची वाढ; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?
Gold Price Today: सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात घसरण, १ तोळा सोनं १ लाख ५८ हजार रुपयांवर

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,५५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,२१,०१० रुपये खर्च करावे लागतील. रविवारी हे सोनं १,२१,०१० रुपयांना विकले गेले. तर आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १५,५०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,१०,१०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. रविवारी हे सोनं ११,९४,६०० रुपयांना विकले गेले.

Gold Price Today: सोन्याने पुन्हा भाव खाल्ला, १० तोळ्यामागे २०,७०० रुपयांची वाढ; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?
Gold Price Today: सोन्याला पुन्हा चकाकी, १० तोळे १९,१०० रुपयांनी महागले; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?

दरम्यान, सोन्यापाठोपाठ आज चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात २५ रुपयांनी वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदी तब्बल २५,००० रुपयांनी वाढली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३,००,००० रुपये खर्च करावे लागणार आहे.

Gold Price Today: सोन्याने पुन्हा भाव खाल्ला, १० तोळ्यामागे २०,७०० रुपयांची वाढ; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?
Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा तेजीत; 1 तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com