Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, सुवर्णनगरीत १ तोळा सोनं ३००० रुपयांनी स्वस्त; चांदीचे दर किती?

Gold-Silver Price: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. १ तोळा सोन्याच्या दरात ३००० रुपयांनी घसरण झाली. तर चांदीच्या दरात देखील ३००० रुपयांची घसरण झाली. सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर...
Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, सुवर्णनगरीत १ तोळा सोनं ३००० रुपयांनी स्वस्त; चांदीचे दर किती?
Gold and silver prices Saam Tv
Published On

Summary -

  • जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण

  • १ तोळा सोनं तब्बल ३,००० रुपयांनी स्वस्त झाले

  • चांदीच्या दरात देखील ३,००० रुपयांची घसरण झाली

  • दर घसरल्याने सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी

संजय महाजन, जळगाव

जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात सतत चढ-उतार सुरू आहे. आज जळगावच्या सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरामध्ये विक्रमी घसरण झाली आहे त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज सोन्याचे दर ३ हजार रुपयांनी कमी झाले. त्यापाठोपाठ चांदीचे दर देखील ३ हजार रुपयांनी घसरले.

जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ५६ हजार ४५ रुपयांवर पोहचले आहे. तर चांदीचे दर २ लाख ४९ हजार २६० रुपयांवर आले आहे. गेल्या महिनाभरात पहिल्यांदाच सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. सोनं-चांदीचे दर घसरल्यामुळे आज सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी सराफा बाजारामध्ये मोठी गर्दी केली आहे.

Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, सुवर्णनगरीत १ तोळा सोनं ३००० रुपयांनी स्वस्त; चांदीचे दर किती?
Gold Rate: सोनं खरेदी करताय? थांबा... प्रति तोळा दर १ लाखांच्या खाली येणार, कुणी वर्तवला अंदाज

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटचे १ तोळा सोनं २,२४० रुपयांनी स्वस्त झाले. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,५४,२०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २,०५० रुपयांनी घसरण झाली. हे सोनं १,४१,३५० रुपये झाले आहे. तर १८ कॅरेटचे १ तोळा सोनं १,६८० रुपयांनी स्वस्त झाले.

Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, सुवर्णनगरीत १ तोळा सोनं ३००० रुपयांनी स्वस्त; चांदीचे दर किती?
Gold Rate Today: खुशखबर! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर घसरले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

तर, सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, १ ग्रॅम चांदीचे दर ८ रुपयांनी घसरले. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २६० रुपये खर्च करावे लागतील. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये ८००० रुपयांनी घसरण झाली. ही चांदी खरेदीसाठी तुम्हाला २,६०,००० रुपये मोजावे लागतील.

Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, सुवर्णनगरीत १ तोळा सोनं ३००० रुपयांनी स्वस्त; चांदीचे दर किती?
Gold Rate Today : आजही सोन्याचे दरात मोठी घसरण, प्रति तोळा 'इतक्या' रूपयांवर घसरलं, वाचा 24, 22 आणि 18k ताजे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com