

सोन्याचे दर घसरले
सोन्याच्या दरात मागच्या आठवड्यापासून सलग घसरण
सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,०४८ रुपयांनी घसरले
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. खरेदीदारांना थोडासा दिलासा मिळाला आहे. सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मागच्या आठवड्यात सलग घसरण झाली होती. त्यानंतर आता नवीन आठवड्याचीही सुरुवात चांगली झाली, असं म्हणायला हरकत नाही. आज सोन्याचे भाव घसरले आहेत.
२४ कॅरेट सोन्याचे भाव प्रति तोळ्यामागे १,३१० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १.५६ लाखांच्या घरात आहे. सोन्याचे भाव १.८२ लाखांवर पोहचले होते. सोन्याने उच्चांक गाठला होता. त्यानंतरआता सोनं स्वस्त होत आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. जाणून घ्या आजचे सोन्याचे भाव.
आजचे सोन्याचे दर (Gold Rate Today)
आज २४ कॅरेट सोन्याचे दर १,३१० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,५६,४४० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर १,०४८ रुपयांनी घसरले असून हे दर १,२,१५२ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे १३,१०० रुपयांची घसरण झाली आहे.
२२ कॅरेटचे दर (22k Gold Rate)
गुडरिटर्न्सच्या वेबसाइटनुसार, २२ कॅरेट सोन्याचे दर १२०० रुपयांनी कमी झाले आहे. हे दर १.४३ लाख रुपये झाले आहे. ८ ग्रॅममागे ९६० रुपयांची घसरण झाली असून हे दर १,१४,७२० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १२००० रुपयांनी घसरले असून १४,३४,००० रुपये झाले आहेत.
१८ कॅरेट सोन्याचे दर (18K Gold Rate)
आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे जवळपास हजार रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,१७,३३० रुपये झाले आहे. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ७८४ रुपयांनी घसरले असून हे दर ९३,८६४ रुपये झाले आहे. १० तोळ्यामागे सोनं ९,८०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर ११,७३,३०० रुपये झाले आहे.
चांदीचे दर (Silver Rate)
आज चांदीचे दर देखील घसरले आहेत. १० ग्रॅममागे ७० रुपयांची घसरण झाली आहे. १०० ग्रॅममागे ७०० रुपयांची घसरण झाली असून हे दर २६,८०० रुपये झाले आहेत. १००० ग्रॅममागे चांदीचे दर ७००० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर २,६८,००० रुपये झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.