Gold, Silver Rate: बाजारातील चमक उडाली! सोन्यासह चांदीचे दर घसरले; चांदीच्या किमतीत ११,००० रुपयांची घसरण, जाणून घ्या आत्ताचे नवे दर

Gold and Silver Prices : सराफा बाजारात तीव्र अस्थिरतेमुळे चांदीच्या किमती ११,००० रुपयांपेक्षा जास्त दराने घसरल्या आहेत. यासह सोन्याच्या किमतीही घसरल्या आहेत. आजचे अपडेट केलेले सोने आणि चांदीचे दर पाहा.
Gold and Silver Prices
Gold and silver jewellery displayed at a bullion shop as prices witness sharp fluctuations in today’s trading session.saam tv
Published On
Summary
  • चांदीच्या दरात ११,००० रुपयांपेक्षा जास्त घसरण.

  • सोन्याच्या किमतीतही घट; बुलियन बाजारात अस्थिरता.

  • गेल्या वर्षभरात सोन्या-चांदीने मोठा परतावा दिला होता.

सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये आज लक्षणीय चढ-उतार होत आहे. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे नवीन दर जाणून घ्या. गेल्या वर्षभरात सोन्याने जवळजवळ ८०% आणि चांदीने १८०% पेक्षा जास्त परतावा दिला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार श्रीमंत झालेत. परंतु गेल्या दोन ते तीन दिवसापासून चांदीच्या दरात घसरण झाल्याने गुंतवणुदारांमध्ये चिंता वाढलीय. घसरत्या दरामुळे सामान्य ग्राहकांना लाभ होताना दिसतोय.

Gold and Silver Prices
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे ₹२००० मिळवण्यासाठी फार्मर आयडी गरजेचे, रजिस्ट्रेशन कसं करायचं? वाचा सविस्तर

गेल्या काही दिवसांपासून किमतींमध्ये लक्षणीय चढ-उतार होत आहेत. लग्नाच्या हंगामामुळे दिल्ली आणि मुंबईसारख्या प्रमुख शहरांमध्ये २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याची मागणी वाढलीय, परंतु किमतीतील तीव्र चढउतारांमुळे खरेदीदार गोंधळलेत. जागतिक तणाव आणि सुरक्षित आश्रयस्थान मालमत्तेची वाढती मागणीमुळे बाजारात अनिश्चितता निर्माण होतेय.

आज मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. दुपारपर्यंत मार्च चांदीचा भाव ₹११,२६१.०० (४.२०%) ने घसरून ₹२,५७,०५५.०० वर आलाय. हा दर ₹१,८७१ (१.१६) ने घसरून ₹१५९,२७४ च्या पातळीवर पोहोचला आहे.

Gold and Silver Prices
Ration Card: कामाची बातमी! ७० लाख रेशनकार्ड रद्द होण्याची शक्यता; १ एप्रिलपासून नियम बदलणार

ग्राहक संशोधन फर्म स्मिटेन पल्सएआयने केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणात, ६२ टक्के तरुणांनी सोन्याला सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणत आहेत. तर म्युच्युअल फंड, शेअर बाजार आणि क्रिप्टोकडे त्यांनी पाठ फिरवली आहे.

या सर्वेक्षणात १८ ते ३९ वयोगटातील ५,००० लोकांची मुलाखत घेण्यात आली. यात सोन्यावरील विश्वास कायम असला तरी, खरेदी प्रक्रिया बदलतेय. पारंपारिक कुटुंबाच्या निर्णयांवर अवलंबून राहण्याऐवजी तरुण आता स्वतः कमी प्रमाणात सोने खरेदी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com