राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर पदासाठी सोडत जाहीर
जळगावमध्ये ओबीसी महिला आरक्षणामुळे महिला महापौर निश्चित
दीपमाला काळे व उज्वला बेंडाळे आघाडीवर
भाजपमध्ये महिला नेतृत्वासाठी चुरशीची लढत
राज्यात आज २९ महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीत महत्त्वाच्या महापालिकांमध्ये महिला राज पाहायला मिळालं. जळगावमध्ये देखील ओबीसी प्रवर्गातुन महिलांना संधी मिळाली आहे. महापौर पदासाठी अनेक महिलांमध्ये अतितटीचे चुरस रंगली आहे. अशातच दीपमाला काळे आणि उज्वला बेंडाळे यांची नावे जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी चर्चेत असल्याचं म्हटलं जात आहे.
जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला राखीव प्रवर्गातून भाजपकडून दीपमाला काळे, उज्वला बेंडाळे, विद्या सोनवणे, माधुरी बारी, वैशाली पाटील, रंजना वानखेडे, वंदना इंगळे आणि गायत्री राणे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र दीपमाला काळे आणि उज्वला बेंडाळे हे चौथ्यांदा नगरसेवक झाले असल्याने निष्ठावंत म्हणून त्यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जनरलमधून विजयी झालेल्या रंजना वानखेडे, वंदना इंगळे आणि गायत्री राणे या तिघांकडे ओबीसी प्रवर्गाचे जात पडताळणी प्रमाणपत्र असेल तर त्यांनाही संधी मिळू शकते. तर वैशाली पाटील या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात होत्या असून त्या बिनविरोध विजयी झाल्या.
तसेच त्या भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचे कट्टर समर्थक अमित पाटील यांच्या त्या पत्नी असल्याने त्यांनाही संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान ओबीसी महिला राखीव आरक्षण निघाल्याने गेल्या वेळी प्रमाणे, यंदा देखील महापालिकेवर महापौरपदी महिलाच विराजमान होणार असून महापालिकेत महिलाराज पाहायला मिळणार आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.